शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गल्लीतील सुंदर तरुणीशी पतीचं लग्न लावण्याचा पत्नीने धरला हट्ट, पोलिसांत घेतली धाव, नेमकं कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 09:23 IST

Extra Marital Affair: एका महिलेने तिच्या पतीचं दुसरं लग्न गल्लीतील सर्वात सुंदर तरुणीशी लावून देण्याचा हट्ट धरला. महिलेच्या नातेवाईकानी तिची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते असा हेका तिने लावला होता.

उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ठाणा बाजार परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीचं दुसरं लग्न गल्लीतील सर्वात सुंदर तरुणीशी लावून देण्याचा हट्ट धरला. महिलेच्या नातेवाईकानी तिची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते असा हेका तिने लावला होता.

या महिलेने सांगितले की, काही दिवसांपासून माझे पती खूप त्रस्त झालेले होते. मी त्यांना बऱ्याचदा विचारले पण त्यांनी काही घडलेलं नाही, असं सांगत विषय टाळला. मात्र मी त्यांना मुलाची शपथ घातली तेव्हा ते रडू लागले. त्यांनी आपली समस्या सांगितली. त्यानंतर मी बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना शांत केले. माझ्या पतीने सांगितले की, ते एका तरुणीवर प्रेम करतात. तसेच आपलं तिच्याशी लग्न लावून देण्यास सांगितले. जर आमचं लग्न झालं नाही तर मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, मी मरून जाईन असं त्यांनी मला सांगितलं. याशिवाय या महिलेनं सांगितलं की, पतीच्या मनाला होत असलेल्या वेदना आणि त्यांना रडताना पाहून मीही रडू लागले. त्यानंतर मी त्या तरुणीच्या घरी गेले. तसेच माझ्या पतीसोबत त्या तरुणीचं लग्न लावण्याबाबत तिच्या कुटुंबीयांशी बोलले. मी त्यांना सांगितलं की, माझा पती तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो. तसेच तिच्याविना ते डिप्रेशनमध्ये जातील. तसेच ती सुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही. 

महिलेचं हे बोलणं ऐकून या तरुणीचे नातेवाईक संतापले. त्यांनी तिला खडसावून घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर महिलेनं थेट पोलीस ठाणं गाठलं. तसेत तिथे तिने पोलीस अधिकाऱ्यांकडे पतीचं त्या तरुणीशी लग्न करून देण्याची गळ घातली. तिने पोलिसांना सांगितले की, जर माझ्या पतीचं लग्न त्या तरुणीशी झालं नाही तर ते डिप्रेशनमध्ये जातील. ही बाब मी कुठल्याही परिस्थितीत सहन करू शकत नाही. त्यामुळे कृपया त्यांचं लग्न लावून द्या. महिलेचं हे बोलणं ऐकून पोलीस अवाक् झाले. पोलिसांनी तिची खूप समजूत काढली. मात्र ही महिला तिच्या मागणीवर अडून राहिली. 

मिळत असलेल्या माहितीनुसार ही महिला काही दिवसांपूर्वीच आई झाली आहे. यादरम्यान, एक तरुणी तिच्या घरात काम करण्यासाठी येत असे.  या काळात या महिलेचा पती त्या तरुणीच्या प्रेमात पडला. त्या तरुणीला तिच्या कुटुंबीयांनी परत बोलावून घेतल्यावर या महिलेचा पती निराश आणि दु:खी झाला. त्याने जेव्हा पत्नीला सारं काही सांगितलं तेव्हा तीसुद्धा अस्वस्थ झाली. त्यानंतर तिने त्या तरुणीच्या घरी जाऊन पतीसोबत दुसऱ्या लग्नासाठी तिला मागणी घातली.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार