विक्रम लँडरची चंद्रावरील झेप मोठ्या प्लॅनचा भाग होता; इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 04:20 PM2023-09-25T16:20:20+5:302023-09-25T16:20:20+5:30

रविवारी सायंकाळी नासाचे कॅप्सुल एका भल्या मोठ्या शुद्र ग्रहाचे अवशेष घेऊन पृथ्वीवर आले होते. ही किमया काही देशच करू शकतात.

The Vikram lander's leap to the moon was part of a larger plan of return flight; Disclosure on Isro's experiment | विक्रम लँडरची चंद्रावरील झेप मोठ्या प्लॅनचा भाग होता; इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा 

विक्रम लँडरची चंद्रावरील झेप मोठ्या प्लॅनचा भाग होता; इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा 

googlenewsNext

चंद्रावर झोपलेला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दिवस उजाडला तरी जागे झालेले नाहीएत. यामुळे अवघे जग चिंतेत असताना इस्त्रो विक्रम झोपण्यापूर्वी वेगळीच तयारी करत होते. चंद्रयान ३ मोहिम पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ज्यासाठी प्रज्ञान गेले होते ते काम पूर्ण झाले आहे. आता इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा झाला आहे. 

इस्त्रो आता चंद्रयान चंद्रावरील नमुने घेऊन पुन्हा पृथ्वीवर परतू शकेल याची तयारी करत आहे. यासाठीच विक्रम झोपण्यापूर्वी लँडरचे चंद्रावर छोटेसे उड्डाण करण्यात आले होते. याला संशोधक त्यांच्या भाषेत हॉप टेस्ट असे म्हणतात. चंद्राने चाळीस सेंटीमीटर मारलेली उडी या योजनेचाच भाग होती. हा व्हिडीओ अवघ्या जगाने पाहिला होता. 

रविवारी सायंकाळी नासाचे कॅप्सुल एका भल्या मोठ्या शुद्र ग्रहाचे अवशेष घेऊन पृथ्वीवर आले होते. ही किमया काही देशच करू शकतात. इस्त्रोला ही ताकद आत्मसात करायची आहे. याची तयारी म्हणून विक्रमला उंच उडी मारायला लावून पुन्हा ते चंद्रावर लँड करण्यात आले होते. 

येत्या काळात चंद्रावरून सॅम्पल आणले जाऊ शकते. यासाठी या हॉप प्रयोगाचा डेटा महत्वाचा ठरणार आहे. इस्त्रोच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला ही माहिती दिली आहे. यापुढील काळातही इस्त्रो चंद्रावर असे प्रयोग करणार आहे, जेणेकरून तेथील सॅम्पल पुन्हा पृथ्वीवर आणता येतील. 
या साठी सध्या कोणतीही डेडलाईन निश्चित करण्यात आलेली नाहीय. या दिशेने सिस्टिम विकसित करण्यासाठी काम सुरु आहे. यामुळे यान रिटर्न फ्लाईट घेऊ शकणार आहेत. हा त्या मोठ्या प्लॅनचा ट्रेलर आहे, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.  
 

Web Title: The Vikram lander's leap to the moon was part of a larger plan of return flight; Disclosure on Isro's experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.