केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 10:44 IST2024-11-14T10:42:54+5:302024-11-14T10:44:12+5:30

Bihar News: नेतेमंडळींकडून त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कामांचंही उद्घाटन केलं जातं. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येतए केंद्रीय जलशक्तीमंत्री राजभूषण चौधरी यांनी बार असोसिएशनच्या वाचनालयातील सिलिंग फॅनचं औपचारिक उदघाटन केलं.

The Union Minister inaugurated the fan in the library, now the photos are going viral    | केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   

केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   

नेतेमंडळींकडून त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कामांचंही उद्घाटन केलं जातं. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येतए केंद्रीय जलशक्तीमंत्री राजभूषण चौधरी यांनी बार असोसिएशनच्या वाचनालयातील सिलिंग फॅनचं औपचारिक उदघाटन केलं. मंत्रिमहोदयांनी बटण दाबून पंखा सुरू केला आणि उद्घाटनाची औपचारिकता पार पाडली. केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या उद्घाटनाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

केंद्रीय मंत्री राजभूषण चौधरी हे मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार आहेत. १२ नोव्हेंबर रोजी ते आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी जिल्हा बार असोशिएशनला दिलेल्या ४०० पंख्यांचं उदघाटन केलं.  

यावेळी राजभूषण चौधरी यांनी बार असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीचं अध्यक्षपद बार असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश्वर प्रसाद सिंह यांनी भूषवले. यावेळी स्टेट बार कौन्सिलचे सदस्य सच्चिदानंद सिंह यांनी मंत्रिमहोदयांनी केलेल्या सहकार्यामुळे असोशिएशन विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहील, असे सांगितले.   

Web Title: The Union Minister inaugurated the fan in the library, now the photos are going viral