चोरी बनली रहस्य, चोरानं चोरले लाखो, जप्त झाले केवळ २०० रुपये, पोलीसही अवाक्, गुढ काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 20:44 IST2024-03-29T20:44:23+5:302024-03-29T20:44:41+5:30
Crime News: उत्तराखंडमधील एका भाजी बाजारातून चोरण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र त्याच्याकडून केवळ २०० रुपयेच जप्त करण्यात यश मिळालं आहे.

चोरी बनली रहस्य, चोरानं चोरले लाखो, जप्त झाले केवळ २०० रुपये, पोलीसही अवाक्, गुढ काय?
उत्तराखंडमधील एका भाजी बाजारातून चोरण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र त्याच्याकडून केवळ २०० रुपयेच जप्त करण्यात यश मिळालं आहे. हा चोर व्यसनी असून, जेव्हा त्याला याआधी अटक करण्यात आली. तेव्हाही तो घरात झोपलेल्या स्थितीत सापडला होता.
पोलिसांनी सांगितले की, मागच्या काही दिवसांपूर्वी बागेश्व शामा भाजी मंडईमध्ये चोरीची घटना घडली होती. त्यावेळी तक्रारदाराने सांगितले होते की, त्याची लाखो रुपयांनी भरलेली बॅग, दोन लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल चोरीस गेला होता. पोलिसांनी तपास केला आणि दुकानातील सीसीटीव्ही तपासला तेव्हा संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली दिसलीय त्यामध्ये चोर बराच वेळ दुकानामध्ये शोधाशोध करताना दिसत होता. येथे चोराने सुरुवातीला मॅगी आणि अंडं शिजवून खाल्लं. त्यानंतर दुकानातील फळं खाल्ली. तसेच जाताना दुकान मालकाचे कपडे घालून गेला होता.
फुटेजच्या आधारावर पोलिसांनी चोराला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली. हा चोर सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबातील असल्याचे समोर आले. तसेच त्याचे वडील प्रख्यात उद्योजक असल्याची माहितीही समोर आली. मात्र त्याला व्यसन लागल्याने कुटुंबीयांना घरात कोंडून ठेवण्यास सुरुवात केली होती. मात्र एकेदिवशी तो घरातून पळून गेला होता. तसेच खूप भूक लागल्याने त्याने चोरी केल्यासे समोर आले.
दरम्यान, पैशांनी भरलेली बॅग चोरीला गेल्याची बाब पोलिसांना अद्याप उलगडलेली नाही. दुकानदाराने बॅग चोरीला गेल्याचे सांगितले असले तरी या चोराकडून केवळ २०० रुपयेच जप्त केले आहेत. तसेच दुकानदारानेही चोरीला गेलेल्या रकमेचा आकडा सांगितलेला नाही. त्यामुळे ही रक्कम रहस्य बनली आहे. सध्या आचारसंहिता लागलेली असल्याने दुकानदार रकमेचा आकडा सांगत नसल्याचेही बोलले जात आहे.