दहशतवाद्यांना घेरले होते, एका चढणीवर जाताच अचानक हल्ला झाला; तीन बडे अधिकारी शहीद झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:19 IST2023-09-14T13:16:19+5:302023-09-14T13:19:29+5:30
Jammu-Kashmir Encounter: आपण भारताने पाकिस्तानला कसे हरविले याची चर्चा करत होतो, तिकडे पाकिस्तानी दहशतवादी भारताचे मोठे नुकसान करून गेले...

दहशतवाद्यांना घेरले होते, एका चढणीवर जाताच अचानक हल्ला झाला; तीन बडे अधिकारी शहीद झाले
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. एक कर्नल, एक मेजर आणि एक डीएसपी होते. कोकेरनाग भागात जवानांवह हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष धोनचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला.
जवानांची टीम उंच जागेवर चढताच आधीच लपून बसलेल्या 2-3 दहशतवाद्यांनी समोरून गोळीबार सुरू केला. यात कर्नलचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या. त्यांना विमानाने श्रीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतू त्यांचे प्राण वाचले नाहीत. हे दहशतवादी लष्कर ए तौयबाच्या प्रॉक्सी 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) शी संबंधित होते.
कर्नल मनप्रीत सिंग या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. सिंग यांना 2021 मध्ये शौर्यसाठी सेना पदक प्रदान करण्यात आले. तर मेजर आशिष ढोंचक यांना काही आठवड्यांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी शौर्यपदक प्रदान करण्यात आले होते. पोलीस अधिकारी हुमायून भट यांचे वडील जम्मू-काश्मीर पोलीस मधील आयजी पदावरून निवृत्त झाले होते.
या दहशतवादी हल्ल्यात कोकरमागचा अतिरेकी उझैर खान याचे नाव समोर आले आहे. हा संपूर्ण हल्ला त्याने दोन दहशतवाद्यांच्या साथीने केला आहे.