शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी कांदळवने हटणारच, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:08 IST

नवी दिल्ली : उत्तर मुंबईतील वर्सोवा-भाईंदर रस्ते प्रकल्पासाठी ४५,००० हून अधिक कांदळवने हटविण्यास मुंबई महापालिकेला परवानगी देणाऱ्या मुंबई उच्च ...

नवी दिल्ली : उत्तर मुंबईतील वर्सोवा-भाईंदर रस्ते प्रकल्पासाठी ४५,००० हून अधिक कांदळवने हटविण्यास मुंबई महापालिकेला परवानगी देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची व न्या. विपुल एम. पंचोली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने नमूद केले की, प्रस्तावित रस्त्यामुळे पश्चिम महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल; परिणामी, या रस्त्याचा सामान्य जनतेवर महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर परिणाम होईल. सर्वोच्च न्यायालयाने बीएमसीला निर्देश दिले की, भरपाई म्हणून करण्यात आलेले वृक्षारोपण आणि कांदळवनांचे पुनरुज्जीवन कोणत्या प्रमाणात झाले आहे, याचा तपशील देणारे वार्षिक अहवाल त्यांनी उच्च न्यायालयात सादर करावेत.

‘वनशक्ती’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ चंदर उदय सिंग यांनी असा युक्तिवाद केला की, बीएमसीने यापूर्वीच केलेल्या वृक्षारोपणाचे दाखले देऊन उच्च न्यायालयाची परवानगी मिळवली आहे.

९ हजार कांदळवने कायमस्वरूपी तोडणार -‘मुंबई कोस्टल रोड (उत्तर)’ प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात अंदाजे ६०,००० कांदळवने येत असली तरी त्यापैकी सुमारे ४५,००० कांदळवनांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार आहे. या ४५,००० कांदळवनांपैकी सुमारे ९००० कांदळवने कायमस्वरूपी तोडली जाणार आहेत. 

या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी महानगरपालिकेला २०,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प १०३ हेक्टर क्षेत्राच्या मार्गरेषेवरून जाणार आहे.

पालिकेतर्फे काय बाजू मांडली? - उच्च न्यायालयाचा आदेश येण्याच्या दोन महिने आधीची उपग्रह छायाचित्रे उपलब्ध आहेत. ती ही वस्तुस्थिती सिद्ध करतात. हे आरोप फेटाळून लावत, पालिकेतर्फे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, या रस्त्याच्या बांधकामामुळे प्रवासाचा वेळ व वाहतूक कोंडी कमी होईल. १२ डिसेंबर २०२५ रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Upholds Mangrove Removal for Mumbai Road Project

Web Summary : The Supreme Court refused to interfere with the Bombay High Court's order allowing the removal of mangroves for the Versova-Bhayander road. The court noted the road would ease traffic and directed the BMC to submit annual reports on compensatory afforestation to the High Court.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbaiमुंबई