शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 08:30 IST

"हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत."

नवी दिल्ली / इम्फाळ : मणिपूरमध्ये “अनिश्चितता आणि भीती” मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार तेथील “अत्यंत गंभीर” परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी विरोधी आघाडीचे शिष्टमंडळ परतल्यानंतर केला. येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत.

सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी‘इंडिया’  आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी केंद्र सरकारच्या ‘मौना’बद्दल टीका केली. तसेच, ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीबद्दल सरकार उदासीनता दर्शवित असल्याचे म्हटले आहे.

राज्यपालांना दिलेल्या निवदेनात काय?मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत सतत गोळीबारामुळे हे निःसंशयपणे सिद्ध होते की राज्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या इंटरनेटवरील बंदीमुळे अफवा पसरल्या जात आहेत. सर्व समुदायांमध्ये संताप आणि परकेपणाची भावना आहे आणि विलंब न करता त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.

८९ दिवसांपासून  मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून ती माहिती केंद्र सरकारला द्यावी, असे शिष्टमंडळाने म्हटले. १४० हून अधिक मृत्यू मणिपूरमध्ये आतापर्यंत झाले आहेत.५००० घरे जाळली गेली आहेत. ६० हजार लोक विस्थापित झाली आहेत.

शिष्टमंडळात काेण?या शिष्टमंडळात काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई,  सुष्मिता देव, महुआ माझी, कनिमोळी, मोहम्मद फैजल, जयंत चौधरी, मनोज कुमार झा, एन. के. प्रेमचंद्रन, टी. तिरुमावलावन, डी. रविकुमार यांच्याशिवाय राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह आणि अनिल प्रसाद हेगडे, संदोश कुमार, ए. ए. रहीम, सपाचे जावेद अली खान, आययूएमएलचे ई. टी. मोहम्मद बशीर, आपचे सुशील गुप्ता आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद सावंत यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार