"योग्य वेळी योग्य पंतप्रधान आले, यामुळे..."; व्यासपीठावर CM चंद्राबाबू असं काय म्हणाले की, PM मोदींनी हात जोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:01 IST2025-01-09T17:00:49+5:302025-01-09T17:01:47+5:30
चंद्रबाबू नायडू म्हणाले, "पंतप्रधान मोदी विकासाच्या बाजूने आहेत. मी त्याच्याकडून प्रेरणा घेतो. पंतप्रधानांचे कौतुक करताना नायडू म्हणाले, ते (मोदी) केवळ भारतीय नेतेच नाही, तर जागतिक नेते झाले आहेत. ते सर्व जागतिक नेत्यांपेक्षा फार वर आहेत."

"योग्य वेळी योग्य पंतप्रधान आले, यामुळे..."; व्यासपीठावर CM चंद्राबाबू असं काय म्हणाले की, PM मोदींनी हात जोडले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला भेट दिली. दरम्यान त्यांनी २ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ज्यात पंतप्रधान मोदी हसत-हसत हात जोडताना दिसत आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जनसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू म्हणाले, "पंतप्रधान मोदी विकासाच्या बाजूने आहेत. मी त्याच्याकडून प्रेरणा घेतो. पंतप्रधानांचे कौतुक करताना नायडू म्हणाले, ते (मोदी) केवळ भारतीय नेतेच नाही, तर जागतिक नेते झाले आहेत. ते सर्व जागतिक नेत्यांपेक्षा फार वर आहेत."
"योग्य वेळी, योग्य पंतप्रधान आले... -
नायडू म्हणाले की, "योग्य वेळी, योग्य पंतप्रधान (मोदी) आले. यामुळे ब्रँड इंडिया पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक स्तरावर मोठी प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती होत राहील, असा विश्वास मी व्यक्त करतो. ते लोकांसाठी आणि देशासाठी अथक संघर्ष करत आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, गति शक्ती आणि सागर माला यांसारखे महत्त्वाचे उपक्रम भारताला उज्ज्वल आणि अधिक समृद्ध भविष्याकडे घेऊन जात आहेत.
भारत २०४७ पर्यंत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल...
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत २०१४ मध्ये जागतिक स्तरावर ११ व्या क्रमांकावर होता; आज तो पाचव्या स्थानावर आहे. २०२९ पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०४७ पर्यंत तो पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो, हे केवळ मोदींच्या नेतृत्वाखालीच साध्य होऊ शकते."