शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव वाढला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 05:42 IST

भाजप नेतृत्वाचा मात्र नकार

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर टिप्पणीनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर राजीनामा देण्याचा तीव्र दबाव असू शकतो; पण भाजप नेतृत्व किमान सध्या तरी त्यांचा राजीनामा घेण्यास इच्छुक नाही. 

सत्ताधारी भाजपने संसदेत मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आणि पंतप्रधानांनी आपली वेदना आणि व्यथा व्यक्त केली; पण दोन कुकी महिलांना विवस्त्र फिरविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असताना भाजप नेतृत्व मुख्यमंत्र्यांना हटवण्यास सहमत होण्याची शक्यता नाही. 

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीही एकतर गुन्हेगारांवर कारवाई करा अन्यथा बाजूला हटा, न्यायालय कारवाई करेन, अशी टिप्पणी केली होती. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे पक्ष नेतृत्व विद्यमान मुख्यमंत्र्यांना हटवण्याची शक्यता नाही. एका विशिष्ट समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सध्याचे संकट उद्भवल्याचे ते म्हणाले. एवढी वर्षे राज्यात पूर्ण शांतता आणि सलोखा होता आणि न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्रिया म्हणून हिंसाचार उसळला. प्रशासनाला सुरुवातीला याचा अंदाज आला नाही.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCrime Newsगुन्हेगारीChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा