शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रातील जनता सरकार पाडून उत्तर देईल", अखिलेश यादवांची भाजपवर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:05 IST

Shivaji Maharaj Statue:मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे.

Akhilesh Yadav on shivaji maharaj statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. सोमवारी (२६ ऑगस्ट) घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात आणि देशात उमटले आहेत. लोक संताप व्यक्त करत असून, विरोधकांनी महायुती सरकारला घेरले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर आगपाखड केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर राजकारण तापले आहे. महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. अखिलेश यादव यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. या घटनेची चौकशी करून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.  "मोदींनी अनावरण केलेला पुतळा पडणे दुर्दैवी"

अखिलेश यादव यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, "भाजपने केलेले प्रत्येक काम भ्रष्टाचाराचा बळी ठरत आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याचे अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, तो कोसळणे दुर्दैवी घटना आहे."

"पुतळा उभारण्याशी संबंधित सर्व सरकारी आणि खासगी लोकांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी", अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल -अखिलेश यादव  

अखिलेश यादव यांनी पुढे म्हटले आहे की, "ही केवळ महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण देशाच्या भावना दुखावणारी घटना आहे. महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत भाजप भ्रष्टाचाराच्या अशा कृत्यांना भाजपचे सरकार पाडून उत्तर देईल", असे टीकास्त्र अखिलेश यादव यांनी डागले. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुती