"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 19:20 IST2025-11-18T19:16:58+5:302025-11-18T19:20:06+5:30

ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी लालू यादव यांच्या मुलांनी त्यांचे मूत्रपिंड का दान केली नाही?, असा प्रश्न केला आहे.

"The only sermon that can be preached on a bottle of blood is the one whose blood dries up...", Rohini Acharya targets Tejashwi Yadav | "एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा

"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा

बिहार विधानसभा निवडणुकीत राजदचा पराभव झाला. यानंतर ज्येष्ठ नेते लालू यादव यांच्या कुटुंबात फूट पडली आहे. लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी  लालू यादव यांच्या मुलांनी त्यांचे मूत्रपिंड का दान केली नाही?, असा प्रश्न केला.  त्यांनी इतर अनेक गोष्टींबद्दल देखील लिहिले आहे. "मूत्रपिंड दान करण्याची वेळ आली तेव्हा मुले पळून गेली. त्यांनी त्यांच्या विवाहित बहिणीकडून मूत्रपिंड का घेतली?, असा सवालही त्यांनी केला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण

तेजस्वी यादव आणि संजय यादव यांच्यावर टीका केली. रोहिणी आचार्य यावरुन ट्विट केले. "ज्यांना लालूजींच्या नावाने काहीतरी करायचे आहे, त्यांनी खोटी सहानुभूती दाखवण्याऐवजी, रुग्णालयात शेवटचे श्वास मोजणाऱ्या आणि मूत्रपिंडांची गरज असलेल्या लाखो गरीब लोकांना त्यांचे मूत्रपिंड दान करण्यासाठी पुढे यावे आणि लालूजींच्या नावाने त्यांचे मूत्रपिंड दान केली पाहिजे, असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

किडनी द्यायच्या वेळी मुल कुठे पळून गेली होती?

ट्विटर पोस्टमध्ये रोहिणी आचार्य यांनी काही प्रश्न विचारले आहेत. "मुल किडनी दान करताना का पळून गेले? त्यांनी त्यांच्या विवाहित बहिणीची किडनी का घेतली? विवाहित मुलीने वडिलांना किडनी दान केल्याबद्दल दोष देणाऱ्यांनी तिच्याशी खुल्या व्यासपीठावर उघड चर्चा करण्याचे धाडस करायला हवे. गरजूंना किडनी दान करण्याचे महान दान प्रथम मुलीच्या किडनीला अपवित्र म्हणणाऱ्यांनी, नंतर हरियाणवी महापुरुषांनी सुरू केले पाहिजे. मला शिवीगाळ करून कधीही न थकणारे चाटुकार पत्रकार आणि हरियाणवीचे भक्त ट्रोलर्स करू द्या. "ज्यांचे रक्त फक्त रक्ताची बाटली दान करण्याच्या नावानेच सुकते, ते आता किडनी दानाविषयी प्रवचन देत आहेत?, असंही रोहिणी आचार्य यांनी म्हटले आहे.

Web Title : रोहिणी आचार्य ने तेजस्वी यादव पर किडनी दान के पाखंड को लेकर निशाना साधा।

Web Summary : रोहिणी आचार्य ने सवाल किया कि उनके भाइयों ने अपने पिता, लालू यादव को किडनी दान क्यों नहीं की, बल्कि अपनी बहन पर निर्भर रहे। उन्होंने उन लोगों की आलोचना की जो अब किडनी दान पर उपदेश दे रहे हैं, जबकि वे रक्त दान करने को तैयार नहीं हैं, और उन पर पाखंड का आरोप लगाया।

Web Title : Rohini Acharya targets Tejashwi Yadav over kidney donation hypocrisy.

Web Summary : Rohini Acharya questioned why her brothers didn't donate a kidney to their father, Lalu Yadav, instead of relying on their sister. She criticized those now preaching about kidney donation while being unwilling to donate blood, accusing them of hypocrisy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.