शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञांची नावे सीलबंद नकोत; अदानीप्रकरणी केंद्राची सूचना फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:25 IST

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात केंद्र सरकारची सूचना सुप्रीम कोर्टाने फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर शेअर बाजारात झालेल्या अदानी समूहाच्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर नियामकीय व्यवस्था मजबूत करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर नेमण्याकरिता तज्ज्ञांची नावे केंद्र सरकारकडून सीलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. जी. बी. पार्डीवाला यांच्या पीठाने हा निर्णय दिला. आम्ही तुमच्याकडून सीलबंद लिफाफ्यातील नावे स्वीकारणार नाही. आम्हाला संपूर्ण पारदर्शकता हवी आहे, असे न्यायालयाने केंद्र सरकारला बजावले. याप्रकरणी एकूण ४ याचिका  दाखल झाल्या आहेत. 

काय आहेत आरोप?अदानी समूहाने घोटाळे करून आपल्या समभागांच्या किमती  वाढविल्या, असा आरोप अमेरिका स्थित हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने केला आहे. त्यानंतर अदानी समूहाचे समभाग भुईसपाट झाले आहेत. सामान्य गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये त्यामुळे बुडाले आहेत. असे प्रकार घडू नयेत, यासाठी बाजाराची नियामकीय चौकट मजबूत असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

...तर सरकार कमजोर होऊ शकतेnअदानी समूहातील गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कमजोर होऊ शकते, असे प्रतिपादन हंगेरीयाई-अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी केले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांतील घसरगुंडीच्या पार्श्वभूमीवर सोरोस यांनी हे वक्तव्य केले आहे. nम्युनिक सेक्युरिटी कॉन्फरन्समध्ये बोलताना सोरोस यांनी सांगितले की, मोदी आणि अदानी हे मित्र आहेत. अदानींवर घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. मोदी गप्प आहेत. तथापि, यासंबंधी विदेशी गुंतवणूकदार व संसदेकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मोदी यांना द्यावी लागतील.

काँग्रेसकडूनही आक्षेपकाँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले की, जॉर्ज सोरोससारख्या लोकांचा याच्याशी काहीही संबंध नाही. आमच्या देशाचा विचार हा नेहरूवादी विचार आहे. आम्हाला आमचा विचार आणि आमची शिकवण हेच सांगते की, जॉर्ज सोरोससारख्या लोकांनी आमच्या देशांतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसू नये.

भाजपचे जोरदार प्रत्युत्तरसोरोस यांच्या वक्त्यव्यास आक्षेप घेत भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले की, सोरोस यांना भारतीय लोकशाही संपवायची आहे. त्यांच्या वक्तव्याचा प्रत्येकाने निषेध केला पाहिजे.

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAdaniअदानी