शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मलेरिया पॅरासाइट डासाच्या शरीरातच होणार नष्ट; प्रभावी संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:39 IST

जेएनयूमध्ये झाले संशोधन; एल-१७१ रसायन ठरले प्रभावी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मलेरियाच्या पॅरासाइटने आता स्वत:त काही बदल केले आहेत. त्याचे आता थंड वातावरणातही उत्परिवर्तन होऊ लागले आहे. त्यामुळे त्याच्यापासून मानवी आरोग्याला असलेला धोका आणखी वाढला आहे. एल-१७१ या रसायनाद्वारे या पॅरासाइटला डासाच्या शरीरामध्येच नष्ट करता येऊ शकते, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

मलेरिया पॅरासाइट स्वत:ला कोल्ड शॉक प्रोटीनमध्ये विकसित करत असताना १५ ते २१ अंश सेल्सियस तापमानातदेखील जिवंत राहून उत्परिवर्तन घडवतो. ही बाब जगात प्रथमच संशोधनातून सिद्ध झाली असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

चार तासांतच दिसतो रसायनाचा प्रभावजर्मनीचे संशोधक क्रिस्टोफ अरेंज यांनी उपलब्ध करून दिलेल्या ‘एल-१७१’ रसायनाच्या डोसनंतर चार-पाच तासांतच डासाच्या शरीरातील मलेरियाचा पॅरासाइट नष्ट होतो. या रसायनाचा उपयोग कॅन्सरवरील औषधे बनविण्यासाठीही केला जातो.

मलेरिया पॅरासाइटवर दीड वर्षे केले संशोधनजेएनयूमधील स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्यूलर मेडिसिन या संस्थेतील प्रा. शैलजा सिंह, डॉ. अंकिता बहल, रुमाएशा शोएब या संशोधकांनी मलेरिया पॅरासाइटवर सुमारे दीड वर्षे संशोधन केले.

संशोधन काय?nडास चावल्यानंतर त्याच्यामार्फत मलेरियाच्या पॅरासाइटचा माणसाच्या शरीरात प्रवेश होतो. nमलेरियाचा पॅरासाइट या तापमाना- पर्यंत जिवंत राहून आजार पसरवत होता. मात्र, आता कोल्ड शॉक प्रोटीन बनवून १५ ते २१ अंश सेल्सियस तापमानातही त्याचे उत्परिवर्तन होत असल्याने मलेरियाबाबतचा धोका आणखी वाढला असल्याचे संशोधकांनी म्हटले.

भारतामध्ये मलेरियाचे रुग्ण

वर्ष     रुग्णसंख्या    मृत्यू२०१८    ४२९९२८    ९६२०१९    ३३८४९४    ७७२०२०    १८६५३२    ९३ २०२१    १६१७५३    ९०२०२२    १७३९७५    ६४

(२०१८ ते २०२२ मधील मलेरियाच्या रुग्णांविषयी नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल या संस्थेच्या वेबसाइटवर दिलेली आकडेवारी)

केंद्र सरकारचे घेणार सहकार्य  संशोधनासाठी जैवतंत्रज्ञान खात्याला सहकार्य करण्याची विनंती संशोधक करणार आहेत.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनhospitalहॉस्पिटल