शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दलचं ते ट्विट डिलिट केलं, काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:36 IST

केरळ काँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर अनेकजण विरोधात आपल मत मांडत आहेत. विशेष म्हणजे काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. या चित्रपटावरुन चांगलाच वादही होत असल्याचे दिसून येते. त्यातच, केरळकाँग्रेसने काश्मीर पंडितांच्या जम्मू काश्मीरमधील पलायनासदर्भात अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटला अनेकांनी प्रत्युत्तर देत हा मुद्दा खोटा ठरवला आहे. 

केरळकाँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळ काँग्रेसने कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले होते. ''ज्यानी कश्मिरी पंडितांना लक्ष्य केले ते दहशतवादी होते. सन 1990 ते 2007 या कालावधीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 399 पंडितांची हत्या झाली आहे. तर, या 17 वर्षांच्या कालावधीत 15 हजार मुसलमांनाची दहशतवाद्यांनी हत्या केली.'', असे केरळ काँग्रसने म्हटले आहे. तसेच, काश्मिरी पंडिताचे पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशानुसार झाले होते, जे स्वत: आरएसएसचे होते.  भाजपने समर्थन केलेल्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारवेळी पंडितांचे पलायन झाले होते. भाजपच्या समर्थनातून व्ही.पी.सिंग यांचे सरकार डिसेंबर 1989 मध्ये सत्तेत आले होते. त्यानंतर, बरोबर 1 महिन्यांनी पंडितांचे पलायन सुरू झाले होते. भाजपने यावर काहीही केले नाही, याउलट नोव्हेबर 1990 पर्यंत व्ही.पी. सिंग सरकारला आपलं सर्मथन दिलं, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर, काँग्रेसने काश्मीरमध्ये पंडितांसाठी 5242 घरं बनवली. पंडितांच्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत केली. त्यामध्ये, पंडितांच्या मुलांसाठी स्कॉलरशीप आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांचा समावेश होता, असा दावाही काँग्रेसने केला.  दरम्यान, काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन ते ट्विट डिलिट केलं आहे. या ट्विटचा वेगळाच अर्थ काढण्यात आला. भाजपचे जातीय अपप्रचाराचा मुद्दा बनवल्याने कालच्या ट्विटमधील काही भाग आम्ही काढला असून वस्तूनिष्ठतेवर आजही आम्ही कायम आहोत, असे केरळ काँग्रसेने आज ट्विट करुन म्हटलं आहे.    

टॅग्स :congressकाँग्रेसKeralaकेरळTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया