वेगवान विकासाचा इतिहास केवळ भाजपचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:15 IST2024-01-18T11:15:26+5:302024-01-18T11:15:46+5:30

या कार्यक्रमात मोदी यांनी नागरिकांचे कल्याण साधण्यासाठी त्यांच्या सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला.

The history of rapid development is only BJP's, Prime Minister Narendra Modi's claim | वेगवान विकासाचा इतिहास केवळ भाजपचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

वेगवान विकासाचा इतिहास केवळ भाजपचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

कोची : वेगवान विकासाचा सिद्ध इतिहास आणि भविष्यासाठी स्पष्ट दृष्टी असलेला भाजप हा भारतातील एकमेव पक्ष आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथील मरीन ड्राइव्ह येथे प्रत्येकी दोन ते तीन बूथस्तरीय क्षेत्रांचा समावेश असलेल्या ‘शक्ती केंद्रां’च्या सुमारे ६,००० पक्ष प्रभारींच्या बैठकीत सांगितले.

या कार्यक्रमात मोदी यांनी नागरिकांचे कल्याण साधण्यासाठी त्यांच्या सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. अलीकडील आकडेवारीनुसार गेल्या नऊ वर्षांत भारताने सुमारे २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. हे सूचित करते की, आपण विकसित राष्ट्रासाठी जी दिशा घेतली आहे ती योग्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

अभिनेता गोपी यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी

गुरुवायूर मंदिरातील प्रार्थनेनंतर मोदींनी आपला पोशाख बदलला आणि अभिनेता-राजकारणी सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली. मामूट्टी, मोहनलाल आणि दिलीप यांच्यासह अनेक मल्याळम चित्रपट सुपरस्टार उपस्थित होते.

Web Title: The history of rapid development is only BJP's, Prime Minister Narendra Modi's claim