शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पना रोखण्यासाठी पहिले पाऊल? भारत सरकारचा बडा अधिकारी चीनला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 19:27 IST

चीन आणि अमेरिकेत ट्रेड वॉरमुळे आधीपासूनच संबंध ताणले गेलेले आहेत. याला ट्रम्पनीच पहिल्या कार्यकाळात सुरुवात केली होती.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी टेरिफ वॉर, घुसखोरांवरून वादग्रस्त भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. व्हिसावर येणाऱ्या परदेशी नागरिकांनाही त्यांनी कठोर नियमावली लागू करण्याचे व त्यांना रोखण्याची तयारी सुरु केली आहे. यात भारताविरोधातही भूमिका आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी भारतानेही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून भारत चीनसोबत रणनिती आखण्याच्या तयारी लागला आहे. 

चीन आणि अमेरिकेत ट्रेड वॉरमुळे आधीपासूनच संबंध ताणले गेलेले आहेत. याला ट्रम्पनीच पहिल्या कार्यकाळात सुरुवात केली होती. आता त्याचा दुसरा टप्पा सुरु होण्याची शक्यता आहे. युरोपनेही याचा धसका घेतला असून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प शपथ घेण्यापूर्वीच आपली शस्त्रांची ताकद वाढवावी लागेल असा इशारा युरोपिय देशांना दिला आहे. ट्रम्प यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्याने भविष्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जाता येईल याची मोर्चेबांधणी मोदी सरकारने सुरु केली आहे.  भारत आणि चीनमधील परराष्ट्र सचिव-उपमंत्री यंत्रणेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री २६-२७ जानेवारी रोजी बिजिंगला जाणार आहेत. याबाबतची माहिती गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

गेल्या महिन्यातच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची बिजिंगला भेट घेतली होती. पाच वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर चीनसोबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे अमेरिकेविरोधात भारत, चीन काही व्यापारी भिंत उभारू शकतात का, याचीही चाचपणी केली जाणार आहे. 

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प