पहिला प्लॅन फसला...! ब्युटी पार्लरवरून रिसेप्शनला जाणाऱ्या नवरीला तिचा बॉयफ्रेंड पळवून घेऊन गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:07 IST2025-02-20T10:07:07+5:302025-02-20T10:07:24+5:30

नवरीला लग्न समारंभातून पळवून नेण्यासाठी बॉयफ्रेंडने फुलप्रूफ प्लॅन बनविल्याचे यावरून दिसत आहे.

The first plan failed...! Bride running away with her boyfriend from reception after marriage, First Plan fail, second works, All shocks | पहिला प्लॅन फसला...! ब्युटी पार्लरवरून रिसेप्शनला जाणाऱ्या नवरीला तिचा बॉयफ्रेंड पळवून घेऊन गेला

पहिला प्लॅन फसला...! ब्युटी पार्लरवरून रिसेप्शनला जाणाऱ्या नवरीला तिचा बॉयफ्रेंड पळवून घेऊन गेला

लग्नातून मुलीला पळवून नेण्याचे प्रकार तुम्ही सिनेमांमध्ये पाहिले असतील. परंतू प्रत्यक्षातही असे प्रकार घडले आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये नुकताच हा प्रकार घडला आहे. लग्नसमारंभात ब्युटी पार्लरवरून नटून थटून आपल्या रिसेप्शनला येत असलेल्या नवरीला तिच्या बॉयफ्रेंडने पळवून नेले आहे. एवढेच नाही तर ज्या कारमधून नवरा-नवरीची वरात जाणार होती, ती कार देखील पंक्चर करून ठेवण्यात आली होती, असे समोर आले आहे. 

नवरीला लग्न समारंभातून पळवून नेण्यासाठी बॉयफ्रेंडने फुलप्रूफ प्लॅन बनविल्याचे यावरून दिसत आहे. नवरदेवाच्या तक्रारीनंतर पोलीस तपासाला लागले आहेत. टीटी नगरच्या आशिष रजक याचे लग्न गंजबासौदाच्या रौशनी सोळंकीशी लागले होते. मुलीच्या गावातच लग्न लागले, तिथून बुधवारी नवरा-नवरी  टीटी नगरला आले. बुधवारी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यासाठी नवरा नवरी दोघेही ब्युटी पार्लरला गेले होते. दोघेही एकाच कारने रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचले. एका बाजुने नवरा उतरला तर दुसऱ्या बाजुने नवरी. हा क्षण घडत असतानाच मोठा खेळ झाला. 

नवरी ज्या बाजुने उतरली त्या बाजुने एक वेगाने कार आली आणि थांबली. एका तरुणाने नवरदेवाच्या बहिणीला धक्का दिला आणि नवरी रोशनीला कारमध्ये बसविले आणि काही कळायच्या आत वेगाने कार चालवत पसारही झाला. लोकांना सुरुवातीला वाटले नवरीला कोणीतरी किडनॅप केले. परंतू ही गोष्ट जेव्हा नवरीकडच्यांना समजली तेव्हा त्यांनी पळवून नेणारा कसा दिसत होता ते विचारले. तेव्हा त्यांना रोशनीच्या बॉयफ्रेंड अंकितनेच तिला पळविल्याचे समजले. मंगळवारीच तिचे लग्न झाले होते, संधी मिळताच पळून जाण्याचा प्लॅन रोशनी आणि तिच्या बॉयफ्रेंडने आखला होता. 

या प्रकारानंतर नवरदेवाला लिंक लागत गेली. लग्नावेळी नवरा-नवरी जाणारी कार पंक्चर झाली होती. ती पंक्चर झाली नव्हती, तर करण्यात आली होती. त्या कारचे टायर फाडण्यात आले होते. यामुळे नवरा-नवरीला वरातीच्या बसमधून यावे लागले होते. 

Web Title: The first plan failed...! Bride running away with her boyfriend from reception after marriage, First Plan fail, second works, All shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न