वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 17:49 IST2025-07-13T17:43:02+5:302025-07-13T17:49:18+5:30

Bihar Crime News: गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी आणि हत्यांच्या घटनांनी हादरत असलेल्या बिहारमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जन्मदात्या वडिलांनीच आपल्या सहा वर्षांच्या मुलाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

The father took his son's life, took him to a hotel, beat him up, and... | वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  

वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी आणि हत्यांच्या घटनांनी हादरत असलेल्या बिहारमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जन्मदात्या वडिलांनीच आपल्या सहा वर्षांच्या मुलाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर पित्याने जक्कनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये या मुलाची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पिता फरार असल्याचे समोल आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर कुटुंब काल हॉटेलमध्ये आलं होतं. हॉटेलमधील एका खोलीत पती, पत्नी आणि मुलगा असे तिघेजण राहत होते. दरम्यान, आज मुलाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. वडिलांनी मुलाला बेदम मारहाण करून जिवे मारल्याचे सांगण्यात येत आहेत. या घटनेनंतर आरोपी बाप फरार झाला असून, मुलाच्या आईने हॉटेलमधील आजूबाजूच्या खोल्यामध्ये राहणाऱ्या लोकांना आणि हॉटेलच्या व्यवस्थापनाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत आरोपी फरार झालेला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृत मुलाच्या आईकडून अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान, हे कुटुंब कुठले आहे. पाटणामध्ये का आलं होतं, सदर व्यक्तीने त्याच्या मुलाची हत्या का केली, या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपीचाही पोलिकांकडून शोध घेतला जात आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.   

Web Title: The father took his son's life, took him to a hotel, beat him up, and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.