वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:18 IST2025-05-02T08:17:49+5:302025-05-02T08:18:09+5:30

केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी मंदिराला १०८ क्विंटल फुलांनी भव्यप्रकारे सजवण्यात आले होते

The doors of Kedarnath temple opened with the chanting of Vedic mantras | वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

देहारादून - देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ धामचं कपाट विधी पूजनासह शुक्रवारी सकाळी ७ पासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेदेखील उपस्थित होते. पुजाऱ्यांना वैदिक मंत्रोच्चार करत आणि भाविकांच्या बम बम भोले या जयजयकारात मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. गुरुवारी बाबा केदार यांची पंचमुखी पालखी केदारनाथ धामला पोहचली. केदारनाथाचं दर्शन करण्यासाठी जवळपास १५ हजाराहून अधिक भाविक तिथे दाखल झाले होते. आज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडले तेव्हा भक्तांच्या हर हर महादेवच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला.

केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी मंदिराला १०८ क्विंटल फुलांनी भव्यप्रकारे सजवण्यात आले होते. गुरुवारी राज्याचे डीजीपी दीपम सेठ आणि अप्पर पोलीस महासंचालक वी मुरूगेशन यांनी श्री बद्रिनाथ आणि केदारनाथ धाम याठिकाणी पाहणी करत सुरक्षा व्यवस्था आणि अन्य तयारीचा आढावा घेतला. यंदा केदारनाथ यात्रेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी टोकन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. टोकन काऊंटर वाढवणे, पीए सिस्टममधून भक्तांची माहिती, स्क्रिनवर स्लॉट आणि नंबर जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एटीएस, पॅरा मिलिट्री दल हेदेखील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

मंदिर परिसरात मोबाईलवर बंदी

केदारनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. केदारनाथ मंदिर परिसरात ३० मीटरमध्ये मोबाईलचा वापर करण्यास मनाई आहे. रिल अथवा फोटो शूट करताना कुणी आढळला तर त्याचा मोबाईल जप्त करण्यात येणार असून ५ हजार रुपये दंडही आकारला जाणार आहे. दरवर्षी हिवाळ्यात होणाऱ्या जोरदार हिमवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराचे कपाट बंद केले जाते. उन्हाळा सुरू होताच पुन्हा कपाट उघडले जाते. 

Web Title: The doors of Kedarnath temple opened with the chanting of Vedic mantras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.