लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 22:50 IST2025-11-10T22:49:57+5:302025-11-10T22:50:48+5:30

लाल किल्ल्याजवळील या स्फोटाच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत तीव्र शोक व्यक्त केला.

The country was shaken by the explosion near the Red Fort; Prime Minister Narendra Modi called Amit Shah and posted, saying- | लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-

लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-

देशाच्या राजधानीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटामुळे देशात खळबळ माजली आहे. या ठिकाणी एका पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक जण जखमी आहेत. या गंभीर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, तसेच दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश मध्ये तातडीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

लाल किल्ल्याजवळील या स्फोटाच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत तीव्र शोक व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "या स्फोटात ज्यांनी आपला जीव गमावला, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. या स्फोटामुळे प्रभावित झालेल्या लोकांना अधिकारी तातडीने मदत करत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी अन्य अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला आहे."

मुंबईत 'चेकिंग' वाढवली, उत्तर प्रदेशमध्ये योगींचे कडक निर्देश

स्फोटाच्या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी त्वरित संपूर्ण परिसर 'कॉर्डन ऑफ' केला असून, सामान्य वाहनांची वाहतूक थांबवली आहे. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.

या घटनेमुळे मुंबई पोलिसांसह संपूर्ण महाराष्ट्रात खबरदारीचे उपाय म्हणून अनेक भागांमध्ये गस्त आणि तपासणी वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कडक निर्देश जारी केले आहेत. दिल्लीतील या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, संपूर्ण परिसरात त्याचा आवाज घुमला आणि लोक घाबरून आपापल्या घरांतून बाहेर पडले. या घटनेने देश हादरला आहे.

Web Title : लाल किले के पास विस्फोट से देश में दहशत; पीएम मोदी ने अमित शाह को फोन किया

Web Summary : दिल्ली के लाल किले के पास विस्फोट में आठ की मौत, दिल्ली, मुंबई और यूपी में हाई अलर्ट। पीएम मोदी ने दुख व्यक्त किया और अमित शाह के साथ स्थिति की समीक्षा की। राज्यों में सुरक्षा कड़ी।

Web Title : Blast near Red Fort Shakes Nation; PM Modi Calls Amit Shah

Web Summary : A blast near Delhi's Red Fort killed eight, prompting high alerts in Delhi, Mumbai, and UP. PM Modi expressed grief and reviewed the situation with Amit Shah. Security tightened across states.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.