शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

'मंत्री शाहमुळे देश लज्जित', सुप्रीम काेर्टाचा दणका; मगरीच्या अश्रूंशी तुलना करीत नाकारली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:44 IST

शाह यांच्याविरोधात चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे व या पथकात राज्याबाहेरील अधिकारी नेमण्याचे आदेश न्यायालयाने मध्य प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना सोमवारी दिले.

नवी दिल्ली : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी केलेल्या असभ्य वक्तव्याने संपूर्ण देश लज्जित झाला, अशा कडक शब्दांत त्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. ‘माफी मागताना शाह यांनी ढाळलेले अश्रू हे नक्राश्रू होते’, असा शेरा मारत त्यांची माफीही न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच, शाह यांच्याविरोधात चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे व या पथकात राज्याबाहेरील अधिकारी नेमण्याचे आदेश न्यायालयाने मध्य प्रदेशच्यापोलिस महासंचालकांना सोमवारी दिले.

न्या. सूर्य कांत आणि न्या. एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने मंत्री शाह यांना सवाल केला की, कुरेशी यांच्याबद्दल तुम्ही केलेल्या वक्तव्याचे व त्यानंतर मागितलेल्या माफीचे व्हिडीओ आम्ही पाहिले. त्यात तुमच्या डोळ्यांत अश्रूही दिसले. ते अश्रू खरे होते की तो कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी केलेला प्रयत्न होता? कर्नल सोफिया यांच्याबद्दल बोलताना तुम्ही अत्यंत अश्लील भाषा वापरण्याच्या विचारात होतात. पण त्यावेळी तुम्ही थोडा शहाणपणा दाखवला किंवा तुम्हाला शब्द सापडले नसावेत. असभ्य वक्तव्य करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आपल्या देशाला लष्कराचा विलक्षण अभिमान आहे आणि त्यातल्या एका महिला अधिकाऱ्याबद्दल तुम्ही असे वक्तव्य करता? असा कठोर शब्दांत न्या. सूर्य कांत यांनी शाह यांना खडसावले. 

अटकेपासून तात्पुरता दिलासा -न्यायालयाने शाह यांना तत्काळ अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याने तपासात पूर्ण सहकार्य करावे, ही महत्त्वाची अट आहे. त्याच्या अधीन राहून सध्या त्यांच्या अटकेला स्थगिती दिली.

कर्नल सोफियांबद्दल केलेल्या वक्तव्याची थेट माफी हवी हाेती मंत्री शाह यांना खंडपीठाने म्हटले की, तुम्ही चूक मान्य करून थेट माफी मागायला हवी होती. मात्र जर मी वादग्रस्त विधाने केली असतील तर त्याबद्दल माफी मागतो, अशी भूमिका तुम्ही घेतली. ही माफी मागायची पद्धत नाही. तुम्ही जे असभ्य वक्तव्य केले त्यामुळे संपूर्ण देश लज्जित झाला. लोकप्रतिनिधी, मंत्री म्हणून प्रत्येक शब्द जबाबदारीने वापरायला हवा होता.

शाह यांच्यावतीने वकील मणिंदर सिंग यांनी सांगितले की, माझ्या अशिलाने माफी मागितली आहे. यावर न्या. सूर्य कांत यांनी विचारले की, विजय शाह यांनी कोणत्या पद्धतीने माफी मागितली आहे हे आम्ही पाहिले. त्यांच्या भाषेत व वागणुकीत पश्चात्ताप दिसत नाही. ‘माफी’ या शब्दाला एक अर्थ असतो. काहीवेळा लोक संकटातून वाचण्यासाठी माफी मागतात. आम्हाला तुमची माफी नको आहे. ज्या व्यक्तीने असभ्य वक्तव्य केले आहे, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील.

एसआयटी चौकशीचे आदेशविजय शाह यांच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आणि एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले तीन सदस्यीय एसआयटी पथक उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पथकात कोणीही आयपीएस अधिकारी मध्य प्रदेशचा नसावा. ते मध्य प्रदेश केडरचे असू शकतात, परंतु ते राज्यातील मूळ रहिवासी नसावेत. एसआयटीने तपासाचा पहिला प्रगती अहवाल २८ मे रोजी न्यायालयात सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस