शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोटा मोजता-मोजता मशिन गरम होतायत अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते...; अमित शाह यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 16:49 IST

ईडीने जेवढी संपत्ती जप्त केली आहे, त्यांतील केवळ 5 टक्के संपत्तीच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची आहे. उर्वरित 95 टक्के काळा पैसा असलेले लोक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून काळ्या पैशांवर कठोरतेने कारवाई झाली आहे. ईडी काळ्या पैशांवर कारवाई करत आहे. ईडीने जेवढी संपत्ती जप्त केली आहे, त्यांतील केवळ 5 टक्के संपत्तीच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची आहे. उर्वरित 95 टक्के काळा पैसा असलेले लोक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. ते आज CNN News18 च्या रायजिंग भारत समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना नेत्यांच्या घरांवरील ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्‍स डिपार्टमेंटच्या छाप्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर थेटे हल्ला चढवला.

अमित शाह म्हणाले, ‘राजकीय नेत्यांविरोधात कारवाईच होऊ नये, असे विरोधी पक्षांना वाटते. मात्र मी स्‍पष्‍टपणे सांगू इच्छितो की, 95 टक्के कारवाया अशा लोकांविरोधात झाल्या आहेत, ज्यांचा राजकारणाशी काही संबंधच नाही.’ यावेळी शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याच्या घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. ते म्हणाले, "ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीत 55 कोटी रुपये मिळाले आहेत. तर, एका कारवाईत काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरातून 355 कोटी रुपये मिळाले. एसबीआयच्या 10 मशिन नोटा मोजता-मोजता थकल्या, गरम झाल्या. तरीही कारवाई होऊ नये, असे विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते."

‘जप्त केलेला पैसा कुणाचा, हे विरोधी पक्ष सांगू शकतो का? -अमित शाह म्हणाले, "छाप्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. मोठा प्रश्न असा आहे की, काँग्रेसच्या खासदाराकडे 350 कोटी आणि ममता बॅनर्जींच्या मंत्र्याकडे 55 कोटी रुपये कुठून आले? नोटांचे बंडल भरण्यासाठी मॅटाडोर आणावा लागला. एक मॅटाडोर कमी पडला, म्हणून पहाटे 4 वाजता नोटा भरण्यासाठी दुसरा मॅटाडोर आणावा लागला. जनता सर्व काही बघत आहे, हे विरोधक विसरत आहेत. हा पैसा कुठे जाणार होता? हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी देशातील जनतेला सांगू शकतील का? एवढेच नाही, तर त्यांच्या खासदाराच्या घरातून जप्त करण्यात आलेले 355 कोटी रुपये कुणाचे आहेत? याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे," असेही शाह यावेळी म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयtmcठाणे महापालिकाBJPभाजपा