शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"संविधान घरावर हल्ला करण्याची परवानगी देत नाही..."; राणा सांगा यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावरून खर्गेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:37 IST

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राणा सांगा यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यसभेत गदारोळ सुरू आहे. या विधानानंतर, रामजी लाल सुमन यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त करत संविधान याला परवानगी देत नाही, असे म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राणा सांगा यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यसभेत गदारोळ सुरू आहे. या विधानानंतर, रामजी लाल सुमन यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त करत संविधान याला परवानगी देत नाही, असे म्हटले आहे. तसेच, आम्ही महाराणा प्रताप, राणा सांगा आणि देशासाठी आपले प्राण देणाऱ्या देशाच्या इतर भागांतील लोकांचाही सन्मान करतो," असेही खर्गे म्हणाले.

तत्पूर्वी, यासंदर्भात बोलताना संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते, या सभागृहात जर कुणी देशाच्या महानायकांचा अपमान करत असेल... हा मुद्दा केवळ सूमन यांचाच आहे, असे मी मानत नाही. ते वरिष्ठ नेते आहेत, मात्र, त्यांनी राणा सांगा यांच्या संदर्भात जे भाष्य केले आहे, ते भलेही संसदेच्या कामकाजातून काढले असेल, पण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे हे विधान कसे कुणी स्वीकारू शकेल. यामुळे, I.N.D.I.A. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे हे विधान फेटाळावे, असे मी म्हणतो."

"खासदाराच्या घरावरील हल्ल्याचा निषेध करतो" - संसदीय कामकाज मंत्री रिजिज्यू यांच्या विधानावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "आपण जे बोलला आहात, आम्ही त्याचे स्वागत करतो. या देशात जे देशभक्त आहेत, देशासाठी लढले आहेत, मी त्यांचा आदर करतो. मात्र, कायदा हातात घेऊन, जर कुणी कुणाच्या घरावर हल्ला करत असेल, तोडफोड करत असेल, जर कुणी त्याच्या संपत्तीचे नुकसान करत असेल, तर हे आम्हाला मान्य नाही. मी याचा निषेध करतो. सभापती जी, आपल्या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र, यांनी तो मुद्दा उपस्थित करत तोडफोड केली. त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. हे अपमानास्पद दलितांविरोधात जे सुरू आहे, ते आम्ही कदापी सहन करणार नाही."

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीRajya Sabhaराज्यसभा