शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

दुसऱ्या महिलेसोबत काँग्रेस नेता रुममध्ये सापडला; पत्नीनं बनवला व्हिडीओ, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 13:35 IST

अलीकडेच रेशमा पटेल हिला पती भरतसिंह सोलंकी महिलेसोबत रूममध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेशमा पटेल हिने काही जणांना सोबत घेत त्या रुमजवळ पोहचली.

अहमदाबाद - गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री राहिलेले भरतसिंह सोलंकी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चक्क त्याच्या पत्नी रेशमा पटेल यांनी बनवला आहे. भरतसिंह सोलंकी यांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत. ज्यावरून भरतसिंह सोलंकी आणि त्यांची पत्नी यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. 

अलीकडेच रेशमा पटेल हिला पती भरतसिंह सोलंकी महिलेसोबत रूममध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेशमा पटेल हिने काही जणांना सोबत घेत त्या रुमजवळ पोहचली. तिथे महिलेसोबत मारहाण करणारा व्हिडीओ बनवला. व्हिडीओत पाहू शकता की, रेशमा महिलेला गुजराती भाषेत काहीतरी सांगताना दिसत आहे त्याचसोबत त्या महिलेला रेशमा कानशिलात लगावते. रेशमा पटेलसोबत गेलेले लोक महिलेचा व्हिडीओ बनवत असतात. महिला तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते. त्यात झटापटीत रेशमा महिलेला मारहाण करते. भरतसिंह सोलंकी हे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे चिरंजीव आहेत. रेशमा आणि भरतसिंह यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. दोघांनी एकमेकांना वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकदा नोटीस पाठवली आहे. मात्र हे काही पहिलं प्रकरण नाही. याआधीही पती-पत्नी यांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप लावले आहेत. काही महिन्यांपूर्वी भरतसिंह सोलंकी यांच्यावर पत्नी रेशमानं घरगुती हिंसाचारचे आरोप लावले होते. भरतसिंह सोलंकीला घटस्फोट देणार नाही असं पत्नीचं म्हणणं आहे. पतीविरोधात बोरसद कोर्टात पत्नीने याचिका दाखल केली होती. या दोघांमध्ये काही वर्षापासून वादविवाद सुरू आहेत. 

राजकीय पदाचा गैरवापर करून अनेकदा माझ्यावर दबाव टाकला जातो असा आरोप पत्नी रेशमाने पतीवर लावला आहे. आता पुन्हा एकदा रेशमाने पती भरतसिंह सोलंकीविरोधात आरोप करत म्हटलंय की, पतीने घरातून मारहाण करत तिला घराबाहेर काढले. कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी ती परदेशात गेली. परंतु परतल्यानंतर पुन्हा भरतसिंह सोलंकी यांनी तिला घरातून बाहेर काढले. आता पत्नी रेशमाला पती अन्य महिलेसोबत एका रूममध्ये असल्याचं समजलं. तेव्हा तिने सोबत काही लोकांना घेऊन त्याठिकाणी जात महिलेला मारहाण केली. तसेच त्या दोघांना एकत्र व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेस