दुसऱ्या महिलेसोबत काँग्रेस नेता रुममध्ये सापडला; पत्नीनं बनवला व्हिडीओ, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 01:34 PM2022-06-01T13:34:35+5:302022-06-01T13:35:12+5:30

अलीकडेच रेशमा पटेल हिला पती भरतसिंह सोलंकी महिलेसोबत रूममध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेशमा पटेल हिने काही जणांना सोबत घेत त्या रुमजवळ पोहचली.

The Congress leader Bharatsinh Solanki was found in the room with another woman; Video made by wife viral | दुसऱ्या महिलेसोबत काँग्रेस नेता रुममध्ये सापडला; पत्नीनं बनवला व्हिडीओ, अन्...

दुसऱ्या महिलेसोबत काँग्रेस नेता रुममध्ये सापडला; पत्नीनं बनवला व्हिडीओ, अन्...

Next

अहमदाबाद - गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री राहिलेले भरतसिंह सोलंकी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चक्क त्याच्या पत्नी रेशमा पटेल यांनी बनवला आहे. भरतसिंह सोलंकी यांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत. ज्यावरून भरतसिंह सोलंकी आणि त्यांची पत्नी यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. 

अलीकडेच रेशमा पटेल हिला पती भरतसिंह सोलंकी महिलेसोबत रूममध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेशमा पटेल हिने काही जणांना सोबत घेत त्या रुमजवळ पोहचली. तिथे महिलेसोबत मारहाण करणारा व्हिडीओ बनवला. व्हिडीओत पाहू शकता की, रेशमा महिलेला गुजराती भाषेत काहीतरी सांगताना दिसत आहे त्याचसोबत त्या महिलेला रेशमा कानशिलात लगावते. रेशमा पटेलसोबत गेलेले लोक महिलेचा व्हिडीओ बनवत असतात. महिला तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते. त्यात झटापटीत रेशमा महिलेला मारहाण करते. 
भरतसिंह सोलंकी हे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे चिरंजीव आहेत. रेशमा आणि भरतसिंह यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. दोघांनी एकमेकांना वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकदा नोटीस पाठवली आहे. मात्र हे काही पहिलं प्रकरण नाही. याआधीही पती-पत्नी यांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप लावले आहेत. काही महिन्यांपूर्वी भरतसिंह सोलंकी यांच्यावर पत्नी रेशमानं घरगुती हिंसाचारचे आरोप लावले होते. भरतसिंह सोलंकीला घटस्फोट देणार नाही असं पत्नीचं म्हणणं आहे. पतीविरोधात बोरसद कोर्टात पत्नीने याचिका दाखल केली होती. या दोघांमध्ये काही वर्षापासून वादविवाद सुरू आहेत. 

राजकीय पदाचा गैरवापर करून अनेकदा माझ्यावर दबाव टाकला जातो असा आरोप पत्नी रेशमाने पतीवर लावला आहे. आता पुन्हा एकदा रेशमाने पती भरतसिंह सोलंकीविरोधात आरोप करत म्हटलंय की, पतीने घरातून मारहाण करत तिला घराबाहेर काढले. कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी ती परदेशात गेली. परंतु परतल्यानंतर पुन्हा भरतसिंह सोलंकी यांनी तिला घरातून बाहेर काढले. आता पत्नी रेशमाला पती अन्य महिलेसोबत एका रूममध्ये असल्याचं समजलं. तेव्हा तिने सोबत काही लोकांना घेऊन त्याठिकाणी जात महिलेला मारहाण केली. तसेच त्या दोघांना एकत्र व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: The Congress leader Bharatsinh Solanki was found in the room with another woman; Video made by wife viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.