या राज्यातील काँग्रेस सरकार राबवणार ‘योगी मॉडेल’, दुकानदारांसाठी लागू केला हा नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:01 IST2024-09-25T17:59:20+5:302024-09-25T18:01:50+5:30
Himachal Pradesh News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी दुकानदारांसाठी त्यांचं नाव आणि पत्ता लिहिणं बंधनकारक केलं होतं. आता योगींच्या पावलावर पाऊल ठेवत हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचं सरकार हेच मॉडेल आपल्या राज्यात राबवणार आहे.

या राज्यातील काँग्रेस सरकार राबवणार ‘योगी मॉडेल’, दुकानदारांसाठी लागू केला हा नियम
तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूंमध्ये झालेल्या भेसळीची घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी दुकानदारांसाठी त्यांचं नाव आणि पत्ता लिहिणं बंधनकारक केलं होतं. आता योगींच्या पावलावर पाऊल ठेवत हिमाचल प्रदेशमधीलकाँग्रेसचं सरकार हेच मॉडेल आपल्या राज्यात राबवणार आहे. हिमाचस प्रदेशमध्येही आता रेस्टॉरंट्स आणि दुकानदारांना आपलं नाव आणि पत्ता लिहिणं बंधनकारक असेल. मंगळवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, ग्राहकांना स्वच्छ भोजन विकलं जावं हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काल एक बैठक घेतली होती. त्यामध्ये रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. लोकांनी खूप चिंता आणि शंका व्यक्त केल्या होत्या. तसेच ज्याप्रकारे उत्तर प्रदेशमध्ये रस्त्याशेजारी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी त्यांचं नाव आणि पत्ता लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे आम्हीही विक्रेत्यांसाठी नाव आणि पत्ता लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी या संदर्भात एक सात सदस्यीय समिती बनवली आहे. त्यामध्ये मंत्री विक्रमादित्य सिंह आणि अनिरुद्ध सिंह यांना हा आदेश लागू करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या बैठकीदरम्यान विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, फेरिवाल्यांसाठी ओळखपत्र देण्यापासून इथक काही कायदे लागू केले जातील. तिरुपती लाडू प्रकरणानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने हे पाऊल उचललं आहे.