"प्रकरण सध्या कोर्टात आहे, अन्यथा तिथे.…’’, मथुरा वादावरून योगींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:44 IST2025-03-26T12:43:18+5:302025-03-26T12:44:26+5:30
Yogi Adityanath News: एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मथुरा वादाबाबतचं प्रकरण सध्या कोर्टात आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचंच पालन करतो आहोत. अन्यथा आतापर्यंत तिथे बरंच काही घडलं असतं,असं सूचक विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं.

"प्रकरण सध्या कोर्टात आहे, अन्यथा तिथे.…’’, मथुरा वादावरून योगींचं मोठं विधान
अयोध्येतील रामजन्मभूमीचा प्रश्न प्रदीर्घ काळ चाललेल्या न्यायालयीन खटल्यानंतर मार्गी लागला होता. तसेच नंतर तिथे राम मंदिरही उभे राहिले. त्यानंतर वाराणसी येथीन ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान, मथुरेतील वादाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक सूचक विधान केलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मथुरा वादाबाबतचं प्रकरण सध्या कोर्टात आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचंच पालन करतो आहोत. अन्यथा आतापर्यंत तिथे बरंच काही घडलं असतं,असं सूचक विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं.
मथुरेच्या मुद्द्यावर भाष्य करताना योगी म्हणाके की, आम्ही मथुरेचा प्रश्न का उपस्थित करू नये, मथुरा ही श्रीकृष्णाची जन्मभूमी नाही आहे का? हे प्रकरण सध्या कोर्टामध्ये आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या आदेशाचंच पालन करत आहोत. अन्यथा तिथे बरंच काही घडलं असतं.
दरम्यान, मुस्लिम लोक उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम सर्वाधिक सुरक्षित आहेत. जर इथे हिंदू सुरक्षित असतील तर मुस्लिमही सुरक्षित आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेज जो जसं समजेल त्याला तशाच भाषेत समजावलं पाहिले, असं सांगत त्यांनी बुलढोझर करवाईचं समर्थन केलं आहे.