विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:30 IST2025-04-20T16:29:34+5:302025-04-20T16:30:20+5:30

Tamilnadu News: कुठे दुर्घटना घडली, अपघात झाला तर अशावेळी संकटात सापडणाऱ्याच्या मदतीला धावण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेणाऱ्या, घटनेचे व्हिडीओ काढणाऱ्यांचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. चेन्नईत मुसधार पाऊस पडत असतानाच नुकताच असाच प्रकार दिसून आला.

The boy was writhing in agony from the electric shock, and people didn't dare to approach him. Suddenly, a young man ran up and... | विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  

विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  

कुठे दुर्घटना घडली, अपघात झाला तर अशावेळी संकटात सापडणाऱ्याच्या मदतीला धावण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेणाऱ्या, घटनेचे व्हिडीओ काढणाऱ्यांचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. चेन्नईत मुसधार पाऊस पडत असतानाच नुकताच असाच प्रकार दिसून आला. येथे पावसामुळे रस्त्यावर भरलेल्या पाण्यातून विजेचा धक्का लागल्याने एक मुलगा तडफडत होता. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांची मदतीसाठी जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात तिथून जात असलेल्या कन्नन नावाच्या तरुणाने हिंमत केली आणि क्षणाचाही विलंब न लावता मुलाजवळ धाव घेत त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

चेन्नईतील अरुंबक्कम परिसरात ही घटना घडली असून, त्याचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तिसरीत शिकणारा एक मुलगा शाळेतून घरी येत असताना त्याचा पाय विजेच्या एखा तुटलेल्या तारेवर पडला. तारेमधून विजेचा प्रवाह सुरू असल्याने त्याला जोरदार धक्का बसला. तो मदतीसाठी आरडाओरडा करू लागला. मात्र त्याच्याजवळ जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती.

दरम्यान, तिथून दुचाकीवरून जात असलेल्या कन्नन नावाच्या तरुणाचं लक्ष या तडफडणाऱ्या मुलाकडे गेलं. सुरुवातीला हा मुलगा घसरून पडला असावा, असं त्याला वाटलं. दरम्यान, तो त्याच्या जवळ गेला असता या मुलाचं शरीर विजेच्या धक्क्यांनी थरथरत असल्याचं दिसलं. या मुलाला विजेचा धक्का बसला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कन्ननने जिवाची पर्वा न करता पाण्यात उतरून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वत:ला विजेचे झटके जाणवत असतानाही त्या मुलाला पाण्यातून ओढून बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले.  

Web Title: The boy was writhing in agony from the electric shock, and people didn't dare to approach him. Suddenly, a young man ran up and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.