Rahul Gandhi Statement on Savarkar News: पुण्यातील एका न्यायालयातराहुल गांधींच्या वतीने एक निवदेन दाखल करण्यात आले. राहुल गांधींचे हे निवेदन वकिलांनी दाखल केले होते आणि त्यात असा उल्लेख होता की, सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जिवाला धोका आहे. सावरकर बदनामी प्रकरणातील खटल्यात राहुल गांधींच्या या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण, दिवस मावळल्यावर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. कारण राहुल गांधींच्या वकिलांनी या विधानाबद्दल खुलासा केला आणि आपणच परस्पर त्या निवेदनातील मजकूर लिहिल्याचे आणि न्यायालयात सादर केल्याचे सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आज मी न्यायालयाला जे निवेदन सादर केले, ते माझ्या अशिलांची न बोलता तयार केले होते. त्या निवेदनातील मजकूर माझे अशिल राहुल गांधी यांच्याशी चर्चा न करताच लिहिला होता. त्यांनी याबद्दल तीव्र हरकत घेतली असून, असहमती व्यक्त केली आहे. त्यामुळे हे निवेदन परत घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहे, असे राहुल गांधी यांची पुणे कोर्टात बाजू मांडणारे वकील मिलिंद पवार यांनी सांगितले.
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जिवाला धोका
सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधीविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणा मिलिंद पवार यांनी राहुल गांधींच्या नावे एक निवेदन न्यायालयात सादर केले. ज्यात असे म्हटलेले होते की, 'सावरकरांवरील माझ्या जिवाला धोका आहे. या प्रकरणातील तक्रारदार नथुराम गोडसेचे वंशज आहेत. तक्रारकर्त्याच्या कुटुंब हिंसक आणि घटनाबाह्य कृत्यांमध्ये होते, याचे पुरावे इतिहासात आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची परवानगी दिली जाऊ नये', असे या निवेदनात गांधीच्या संदर्भाने म्हटले गेले होते.