शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

'देशाचा अपमान करणाऱ्या थरूर यांना काँग्रेसनं बडतर्फ करावं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:03 IST

काँग्रेसचे खासदार शशी थरून यांनी संपूर्ण देशाचा अपमान केल्यामुळे त्यांना पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढून टाकावे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

इंदूर : काँग्रेसचे खासदार शशी थरून यांनी संपूर्ण देशाचा अपमान केल्यामुळे त्यांना पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढून टाकावे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.सत्तेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हिंदुत्वाची शाल पांघरूण हिंदूंना संभ्रमात टाकत आहेत, तर थरूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महादेवाच्या पिंडीवरील विंचवाची उपमा देत आहेत आणि राहुल गांधी महाकालच्या पूजेसाठी मंदिरात जातात; परंतु महाकाल तुम्हाला व तुमच्या पक्षाला क्षमा करणार नाही, असे पात्रा यांनी म्हटले. पात्रा सोमवारी येथे पत्रकारांशी बोलत होते. हिंदूंचा द्वेष करणारे थरूर यांचे हे ताजे वक्तव्य हे काही पहिलेच नाही. यापूर्वी, त्यांनी भारताला पाकिस्तानचा नव्हे तर हिंदू पाकिस्तान व हिंदू तालिबानपासून धोका आहे, असे म्हटले होते. त्यांच्यासाठी राम काल्पनिक व दंतकथा असून आता मात्र हेच हिंदूंना आपलेसे करण्यासाठी मंदिरांवर डोके टेकवत आहेत, असे पात्रा म्हणाले....तर त्यांनी न्यायालयात जावेकाँग्रेसचे नेते हिंदूंच्या भावना व त्यांच्या देवतांवर भाष्य करतात. याच पद्धतीने ते इतर धर्मांबद्दल बोलू शकतात का? २०१४ तील पराभवानंतर काँग्रेस हिंदू हिंदू करीत आहे, असे पात्रा म्हणाले.राफेल विमानप्रकरणी राहुल गांधी नापास झाल्याचे सांगून पात्रा म्हणाले की, जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर त्यांनी न्यायालयात जावे. राफेल म्हणजे राहुल गांधी फेल. २०१९ मध्ये ३०० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस