Bhiwandi : कर्नाटकमधील विजयानंतर भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
By नितीन पंडित | Updated: May 13, 2023 16:56 IST2023-05-13T16:54:04+5:302023-05-13T16:56:20+5:30
Karnataka Assembly Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळवित विजय संपादन केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष करण्यास सुरवात केली आहे.

Bhiwandi : कर्नाटकमधील विजयानंतर भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
- नितीन पंडित
भिवंडी: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळवित विजय संपादन केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष करण्यास सुरवात केली आहे.भिवंडीत काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कार्यालया बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवित काँग्रेस विजयाचा जयजयकार केला. यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील,महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस विरेन चोरघे,सोशल मिडीया अध्यक्ष बाळा हुकमाळी,पडघा शहर अध्यक्ष विनोद भांगरे,उपाध्यक्ष राजु तांबोळी यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.