भारतावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात; अमेरिकी काँग्रेसने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 13:38 IST2026-03-29T13:18:49+5:302026-03-29T13:38:45+5:30

अमेरिकन खासदारांना प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या अहवालात, दहशतवादी संघटनांचे जागतिक, अफगाणिस्तान-केंद्रित, भारत -केंद्रित, देशांतर्गत आणि सांप्रदायिक, विशेषतः शिया-विरोधी, अशा पाच श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे.

Terrorists who attacked India are in Pakistan; US Congress reveals | भारतावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात; अमेरिकी काँग्रेसने केला खुलासा

भारतावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात; अमेरिकी काँग्रेसने केला खुलासा

पाकिस्तानच्यादहशतवादी कारवाया पुन्हा एकदा उघडकीस आल्या आहेत. अमेरिकी काँग्रेसचे संशोधन युनिट असलेल्या 'यूएस काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस'च्या एका ताज्या अहवालाने, पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांबाबतच्या भारताच्या जुन्या आरोपांना आणखी बळकटी दिली आहे. या अहवालात जम्मू आणि काश्मीरशी संबंधित दहशतवादी नेटवर्कवर टीका केली आहे.

अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ! सुनावणीवेळी कोर्टात खरात काय म्हणाला?

अनेक दहशतवादी संघटना भारतात, काश्मीरमध्ये, पाकिस्तानी भूमीवरून कार्यरत आहेत. यामध्ये लश्कर-ए-तैबा, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-जिहाद इस्लामी, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिजबुल मुजाहिदीन यांचा समावेश आहे. या सर्व संघटनांकडून भारताच्या सुरक्षेला धोका कायम आहे, असे अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, पाकिस्तान हे फार पूर्वीपासून विविध दहशतवादी संघटनांचे केंद्र राहिले आहे, यापैकी अनेक संघटना १९८० च्या दशकापासून सक्रिय आहेत. या संघटनांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने अनेक लष्करी कारवाया आणि धोरणात्मक उपाययोजना केल्या असल्या तरी, या संघटना पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. हा अहवाल दक्षिण आशिया तज्ज्ञ के. ॲलन क्रोनस्टॅड यांनी तयार केला आहे.

अमेरिकन खासदारांना प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या अहवालात, दहशतवादी संघटनांचे जागतिक, अफगाणिस्तान-केंद्रित, भारत (काश्मीर)-केंद्रित, देशांतर्गत आणि सांप्रदायिक, शिया-विरोधी, अशा पाच श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे.

तालिबानचा उल्लेखही

जागतिक स्तरावर सक्रिय असलेल्या संघटनांमध्ये अल-कायदा, अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट आणि इस्लामिक स्टेट खोरासान प्रोव्हिन्स यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानशी संबंधित संघटनांमध्ये तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांचा समावेश आहे. देशांतर्गत सक्रिय गटांमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि जैश अल-अदल यांचा समावेश आहे, तर सांप्रदायिक संघटनांमध्ये सिपाही-ए-सहाबा पाकिस्तान आणि लश्कर-ए-झंगवी यांचा समावेश आहे.

पाकिस्तानने २०१४ मध्ये लागू केलेल्या राष्ट्रीय कृती योजनेचा उद्देश देशात कार्यरत असलेल्या कोणत्याही सशस्त्र गटांना नष्ट करणे हा होता. असे असूनही, मोठ्या प्रमाणावरील लष्करी कारवाया, हवाई हल्ले आणि हजारो गुप्तचर माहितीवर आधारित मोहिमा या संघटनांना नष्ट करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या आणि पाकिस्तानात कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांना नष्ट करण्यासाठी अनेक मोठ्या लष्करी मोहिमा आणि लाखो गुप्तचर माहितीवर आधारित मोहिमा देखील अयशस्वी ठरल्या आहेत.

Web Title : अमेरिकी रिपोर्ट: भारत पर हमला करने वाले आतंकवादी पाकिस्तान में

Web Summary : अमेरिकी रिपोर्ट ने भारत के दावों को मजबूत किया: लश्कर-ए-तैयबा जैसे आतंकवादी समूह पाकिस्तान से संचालित होते हैं, जो खतरा पैदा करते हैं। पाकिस्तान के प्रयासों के बावजूद, ये समूह बने हुए हैं। रिपोर्ट में उन्हें खत्म करने के लिए सैन्य अभियानों की विफलता पर प्रकाश डाला गया है।

Web Title : US Report: Terrorists Attacking India Operate from Pakistan Soil

Web Summary : A US report strengthens India's claims: Terrorist groups like Lashkar-e-Taiba operate from Pakistan, posing a threat. Despite Pakistan's efforts, these groups persist. The report highlights the failure of military operations to eliminate them.