'मी भारतीय लष्कराचं शौर्य, साहस आणि पराक्रम देशातील प्रत्येक माता-भगिनीला समर्पित करतो. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे क्रूरता केली होती. त्याने देश आणि जग हादरले होते. सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निष्पाप लोकांची धर्म विचारून, त्यांच्या कुटुंबियांसमोर, त्यांच्या मुलांसमोर हत्या केली. क्रूरपणे मारणे, हा दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता. देशातील बंधुत्वाला तोंडण्याचा नीच प्रयत्नही होता. माझ्यासाठी हे दुःख खूप मोठे होते", असे पंतप्रधाननरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१२ मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर रावबले. त्याच्या यशानंतर मोदींनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या.
कुंकू पुसरण्याचा परिणाम दहशतवाद्यांना कळला
मोदी म्हणाले, "या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, प्रत्येक राजकीय पक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उभे राहिला. आम्ही दहशततवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारताच्या सैन्याला स्वातंत्र्य दिले. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटनेला कळलं आहे की, आपल्या माता-भगिनी आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो."

"ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाहीये. हे देशातील भावनाचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मेच्या मध्यरात्री आणि ७ मेच्या सकाळी संपूर्ण जगाने ही प्रतिज्ञा परिणामांमध्ये बदलताना बघितली. भारताच्या लष्कराने पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर,त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की, भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकतो. पण, जेव्हा देश एकजूट होतो. राष्ट्र प्रथम भावना असते. राष्ट्र सर्वोतोपरि असते, तेव्हा कठोर निर्णय घेतले जातात आणि यशस्वी केले जातात", असे मोदी म्हणाले.