शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

धक्कादायक! ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांचा गोळीबार; एक महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 2:34 PM

नगीना यांचे पती युसुफ लोन यांचीही दोन वर्षांपूर्वी अज्ञातांनी हत्या केली होती. 

पुलवामा : जगभरात ईद शांततेत साजरी केली जात असताना काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पुलवामातील एका घरामध्ये ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांनी घुसून गोळीबार केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी पुलवामातील ज्या घरात घुसले होते त्या घरामध्ये ईद साजरी केली जात होती. त्यांना कळण्याच्या आतच दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला आणि फरार झाले. यामध्ये नगीना नावाची महिला ठार झाली असून भारतीय जवानांनी या दहशतावाद्यांची शोधमोहिम हाती घेतली आहे. नगीना यांचे पती युसुफ लोन यांचीही दोन वर्षांपूर्वी अज्ञातांनी हत्या केली होती. 

दहशतवादी झाकीर मुसाचे समर्थन करणाऱ्या चेहरा झाकलेल्या तरुणांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. श्रीनगरच्या जामिया मशीदीजवळ हा प्रकार घडला आहे. या तरुणांनी ईदच्या दिवशी नमाज पठन करून भारत विरोधी नारे देण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांच्या कारवाईत ठार झालेला दहशतवादी झाकीर मुसा आणि मसूद अझहरचे पोस्टर झळकावले. या पोस्टरवर मुसा आर्मी, काश्मीर बनेल पाकिस्तान असे लिहिले होते. 

गेल्या महिन्यात एका चकमकीवेळी हिजबुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसा ठार झाला होता. तो A++ प्रकारातील दहशतवादी होता. त्याच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. झाकीर मुसा दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुराच्या त्राल भागातील राहणारा होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी