पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:48 IST2025-07-16T07:47:20+5:302025-07-16T07:48:14+5:30
स्थानिक आरोपी परवेझ अहमद जोठार आणि बशीर अहमद या दोघांना एका टेकडीजवळ उभे असलेले पाहिले. तिथे ते दहशतवाद्यांचे सामान हाताळत होते. नंतर, दहशतवादी तेच सामान घेऊन तेथून निघून गेल्याचेही साक्षीदाराने सांगितले.

पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता एका तपास यंत्रणांसमोर धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रमुख साक्षीदाराने राष्ट्रीय तपास संस्थेला सांगितले की, हल्ल्यानंतर तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आनंद साजरा करण्यासाठी हवेत चार राउंड गोळीबार केला. जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने, एनआयएने या स्थानिक व्यक्तीचा शोध घेतला, याला आता "स्टार प्रोटेक्टेड विटनेस" चा दर्जा देण्यात आला आहे. हल्ल्यानंतर काही मिनिटांतच तो दहशतवाद्यांशी समोरासमोर आला होता.
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
'दहशतवाद्यांनी त्याला थांबवले आणि कलमा म्हणण्यास सांगितले. जेव्हा त्याने स्थानिक काश्मिरी भाषेत म्हणण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्याला सोडले आणि लगेचच हवेत चार राउंड गोळीबार केला', असं साक्षीदाराने सांगितल्याची माहिती समोर आली आहे. साक्षीदाराच्या जबाबाच्या आधारे, घटनास्थळावरून चार रिकामे काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, ती आनंद साजरा करण्यासाठी राऊंड फायर केल्याचे आहेत.
याशिवाय, त्याने स्थानिक आरोपी परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद यांना एका टेकडीजवळ उभे असलेले पाहिले तिथे ते दहशतवाद्यांचे सामान हाताळत होते. नंतर दहशतवादी तेथून तेच सामान घेऊन निघून गेले, असंही त्या साक्षीदाराने सांगितले.
मागील महिन्यात, एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या आणि पाठिंबा देण्याच्या आरोपाखाली परवेझ आणि बशीर या दोघांना अटक केली. २१ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता हे तीन पाकिस्तानी दहशतवादी परवेझच्या घरी आला. त्यांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था, पर्यटन स्थळे, मार्ग आणि वेळापत्रकांची माहिती गोळा करण्यात चार तास घालवले. निघताना त्यांनी परवेझच्या पत्नीकडून मसाले आणि तांदूळ पॅक केले आणि त्याला ५०० रुपयांच्या पाच नोटा दिल्या. त्यानंतर, ते बशीरला भेटले आणि २२ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता तिथे पोहोचण्यास सांगितले.