दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी!; लाल किल्ल्यावर ४ अँटी ड्रोन यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 02:22 PM2021-07-20T14:22:23+5:302021-07-20T14:27:09+5:30

Delhi Terrorist Attack: देशाची राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची दहशतवादी संघटना दिल्लीत मोठा हल्ला करण्याचा मनसुबा आखत आहे.

Terrorist attack alert before 15 august in delhi security tight at red fort or other places | दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी!; लाल किल्ल्यावर ४ अँटी ड्रोन यंत्रणा सज्ज

दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी!; लाल किल्ल्यावर ४ अँटी ड्रोन यंत्रणा सज्ज

Next

Delhi Terrorist Attack: देशाची राजधानी दिल्लीमध्येदहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची दहशतवादी संघटना दिल्लीत मोठा हल्ला करण्याचा मनसुबा आखत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची मोहीम दहशतवादी संघटनांनी आखली असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. (Terrorist attack alert before 15 august in delhi security tight at red fort or other places)

सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्लीत ड्रोनच्या माध्यमातून मोठा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. संबंधित माहिती मिळताच संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. 

५ ऑगस्ट रोजीच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे याच दिवशी हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा आहे. दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनाही आता दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खास ट्रेनिंग देण्यात आलं आहे. यात सॉफ्ट किल, हार्ड किल आणि इतर ट्रेनिंगचा समावेश आहे. 

ड्रोनद्वारे हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात एक विशेष ड्रोन कंट्रोल रुम देखील तयार करण्यात आला आहे. तसंच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ४ अँटी ड्रोन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी लखनऊमधून अलकायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आळी होती. त्यांच्या चौकशी दरम्यान अनेक महत्वाचे खुलासे झाल्याचंही सांगण्यात येत आहे. अलकायदाकडून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली जात होती याची माहिती चौकशीतून समोर आली होती. 

Read in English

Web Title: Terrorist attack alert before 15 august in delhi security tight at red fort or other places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.