दिल्लीत दहशतीचे सावट! लाल किल्ला आणि चांदणी चौकातील मंदिर लष्कर-ए-तैयबाच्या निशाण्यावर; हाय अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:52 IST2026-02-21T11:49:36+5:302026-02-21T11:52:25+5:30

'लष्कर-ए-तैयबा' दिल्लीतील ऐतिहासिक स्थळे आणि गजबजलेल्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा मोठा कट रचत असल्याचा गुप्तचर अहवाल समोर आला आहे.

Terror alert in Delhi! Red Fort and Chandni Chowk temple targeted by Lashkar-e-Taiba; High alert issued | दिल्लीत दहशतीचे सावट! लाल किल्ला आणि चांदणी चौकातील मंदिर लष्कर-ए-तैयबाच्या निशाण्यावर; हाय अलर्ट जारी

दिल्लीत दहशतीचे सावट! लाल किल्ला आणि चांदणी चौकातील मंदिर लष्कर-ए-तैयबाच्या निशाण्यावर; हाय अलर्ट जारी

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आली आहे. कुप्रसिद्ध दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा' दिल्लीतील ऐतिहासिक स्थळे आणि गजबजलेल्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा मोठा कट रचत असल्याचा गुप्तचर अहवाल समोर आला आहे. विशेषतः जुन्या दिल्लीतील चांदणी चौक परिसरातील प्रसिद्ध मंदिर आणि लाल किल्ला परिसरात IED स्फोट घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, संपूर्ण राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

इस्लामाबादमधील घटनेचे पडसाद?

समोर आलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका मशिदीत जुम्माच्या नमाजावेळी आत्मघाती स्फोट झाला होता. या घटनेनंतर खवळलेले दहशतवादी गट आता भारतात मोठी घातपाती कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत. लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी दिल्लीत साखळी स्फोट घडवून आणून दहशत पसरवण्याचा विचार करत असल्याचा इनपुट सुरक्षा यंत्रणांना मिळाला आहे.

चांदणी चौक आणि लाल किल्ल्याची सुरक्षा वाढवली!

हा गंभीर इशारा मिळताच दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली आहे. लाल किल्ला, चांदणी चौक आणि परिसरातील सर्व प्रमुख मंदिरांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, संशयास्पद हालचालींवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे. स्थानिक नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१० नोव्हेंबरच्या आठवणी ताज्या

गेल्या वर्षी १० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटाने दिल्ली हादरली होती. त्या भीषण हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. त्या घटनेची जखम अजूनही ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या हल्ल्याचा कट रचला गेल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक गांभीर्याने तपास करत आहेत.

पाकिस्तानमधील स्फोटाचा संदर्भ

पाकिस्तानमधील शहजाद टाऊन येथील 'टेरलाई इमाम बारगाह'मध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा संदर्भ या नव्या अलर्टला जोडला जात आहे. तिथे झालेल्या स्फोटानंतर सीमापार हालचाली वाढल्या असून, भारतात घुसखोरी करून किंवा स्थानिक स्लीपर सेलच्या मदतीने स्फोट घडवण्याचा हा डाव उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कर आणि गुप्तचर विभाग पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाले आहेत.

Web Title : दिल्ली में हाई अलर्ट: लश्कर का लाल किला, चांदनी चौक पर हमले का खतरा

Web Summary : खुफिया जानकारी के अनुसार, लश्कर-ए-तैयबा लाल किला और चांदनी चौक को आईईडी विस्फोटों से निशाना बनाने की साजिश रच रहा है, जिसके बाद दिल्ली में हाई अलर्ट जारी किया गया है। पिछली घटनाओं को देखते हुए प्रमुख स्थानों पर सुरक्षा बढ़ा दी गई है। अधिकारी पाकिस्तान में हाल की घटनाओं से संभावित संबंधों की जांच कर रहे हैं।

Web Title : Delhi on High Alert: Lashkar Targets Red Fort, Chandni Chowk

Web Summary : Delhi is on high alert after intelligence reports indicated a Lashkar-e-Taiba plot to target Red Fort and Chandni Chowk with IED blasts. Security has been heightened at key locations following the alert, reminiscent of past attacks. Authorities are vigilant, investigating potential links to recent events in Pakistan.

टॅग्स :delhiदिल्ली