भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 22:01 IST2025-05-21T21:58:43+5:302025-05-21T22:01:09+5:30

Indigo flight hailstorm: दिल्लीवरून श्रीनगरकडे जात असताना इंडिगोचे विमान थोडक्यात बचावले. विमानाला गारपिटीची तडाखा बसला. गारांचा मारा इतका जोरात होता की, विमानाचे नाकच फुटले.

Terrible shock! IndiGo plane found in hailstorm; Passengers cry, huge chaos on the plane | भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ

भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ

Indigo flight Delhi Srinagar hailstorm: दिल्लीवरून श्रीनगरच्या दिशेने जात असलेल्या इंडिगोच्याविमानातील प्रवाशांना आयुष्यभर विसरता येणार नाही, असा प्रसंग घडला. विमानश्रीनगरच्या दिशेने जात असताना अचानक गारपिटीच्या वादळात सापडले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गारांचा मारा इतका जोरात होता की, टर्ब्युलन्स निर्माण झाला. अचानक हे घडल्याने प्रवाशी जोरात ओरडायला आणि रडायला लागले. त्यामुळे विमानात प्रचंड गोंधळ झाला होता.

वाचा >>"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश

दिल्लीवरून श्रीनगरकडे जात असलेल्या 6E2142 या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला. दिल्लीवरून उड्डाण केल्यानंतर हे विमान सायंकाळी श्रीनगरच्या दिशेने निघाले होते. २२७ प्रवासी आणि विमानातील कर्मचारी घेऊन निघालेले हे रस्त्यातच गारपिटीच्या तडाख्यात सापडले. 

अन् प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला

गारांचा मारा आणि खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाल्याने विमानाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशी घाबरले. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. पण, वैमानिकांनी प्रसंगावधान दाखवत विमान सुरक्षितपणे श्रीनगर विमानतळावर उतरवले. विमानाचे नाक तुटले असले, तरी सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. 

या घटनेबद्दल इंडिगोनेही निवेदन जारी करून माहिती दिली आहे. गारपिटीच्या तडाख्यात विमान सापडले होते. पण, क्रू मेंबर्स आणि वैमानिकांनी प्रोटोकॉलचे पालन करत विमान सुरक्षितपणे श्रीनगरमध्ये उतरवले. विमानतळावरील टीमने प्रवाशांना सुखरुपपणे विमानतळावर नेले. विमान पाहणी आणि दुरुस्तीसाठी पाठवले जाणार आहे, असे इंडिगोने म्हटले आहे. 

Web Title: Terrible shock! IndiGo plane found in hailstorm; Passengers cry, huge chaos on the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.