भीषण अग्नितांडव! 22 लक्झरी बसेस जळून खाक; गॅरेजमध्ये उभ्या केलेल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 18:06 IST2023-10-30T18:06:41+5:302023-10-30T18:06:54+5:30
गॅरेज मोकळ्या जागेत असल्याने आग लागताच तिथे काम करणारे आणि बसशी संबंधीत लोक बाहेर पडू शकले.

भीषण अग्नितांडव! 22 लक्झरी बसेस जळून खाक; गॅरेजमध्ये उभ्या केलेल्या...
बंगळुरूच्या वीरभद्रनगरमध्ये आज दुपारी मोठी आगीची घटना घडली आहे. या आगीत कमीतकमी २२ बस जळून खाक झाल्या आहेत. एका खासगी बसच्या गॅरेजला आग लागल्याचे सांगितले जात आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
एका खुल्या जमिनीवर या बसेस जवळजवळ उभ्या होत्या. यामुळे एका बसला लागलेली आग ही सर्वत्र पसरली. या बसमध्ये वेल्डिंगचे काम केले जात होते. या वेल्डिंग मशीनमधून ठिणगी उडाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात करण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले आहे. या आगीत 18 बस पूर्णपणे जळून खाक झाल्या असून चार बसचे अंशत: नुकसान झाले आहे. गॅरेजमध्ये 35 बसेस होत्या. एकूण 22 बसेसना आग लागल्याचे त्यांनी सांगितले.
गॅरेज मोकळ्या जागेत असल्याने आग लागताच तिथे काम करणारे आणि बसशी संबंधीत लोक बाहेर पडू शकले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.