शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

नियंत्रण रेषेपाशी चीनने आणली अत्याधुनिक शस्त्रे; वाढला तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:43 AM

चर्चेत ताेडगा निघत नसताना वाढली भारताची चिंता

बीजिंग : चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. सीमेजवळ अत्याधुनिक १०० राॅकट लाँचर तैनात केले आहेत. याशिवाय १५५ एमएम कॅलिबरच्या १८१ सेल्फ प्राेपेल्ड हाॅवित्झर ताेफा तैनात केल्या आहेत. एकीकडे दाेन्ही देशांतील चर्चांमध्ये ताेडगा निघत नसताना चीनच्या हालचालींमुळे भारताची चिंता वाढली आहे.भारताने एलएसीजवळ एम ७७७ अल्ट्रा लाइट हाॅवित्झरसह लष्कराच्या तीन रेजिमेंट तैनात केल्या आहेत. त्याचे प्रत्युत्तर म्हणून चीनने ही तैनाती केली आहे. हिवाळ्यामध्ये हाडे गाेठविणाऱ्या थंडीमध्ये हिमालयातील सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे चीनचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये लष्कर माघारीवरून चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात कमांडर पातळीवरची चर्चा निष्फळ ठरली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांनी चीनने युद्धाचीही धमकी दिली हाेती. आता चीनने या प्रकारे तैनाती केल्यामुळे ड्रॅगनचे इरादे स्पष्ट हाेत आहेत.राॅकेटची क्षमता ६५० किलाेमीटर चीनने एलएसीवर पीएचएल ०३ लाँग रेंज मल्टिपल राॅकेट लाँचर यंत्रणा तैनात केली आहे. या राॅकेट लाँचरचे १० युनिट लडाखच्या सीमेजवळ तैनात करण्यात आले आहेत. एका युनिटमध्ये १२ लाँचर ट्युब असतात. राॅकेटची ६५० किलाेमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य वेधण्याची क्षमता आहे. ताशी १२ किलाेमीटर एवढा या राॅकेटचा वेग आहे. चीनने याशिवाय पीसीएल १९१ राॅकेट लाँचर तैनात केले आहेत. यंत्रणेची ३५० किलाेमीटरपर्यंत मारक क्षमता आहे. पीसीएल १८१ ट्रक माउंटेड हाॅवित्झर आणि सेल्फ प्राेपेल्ड हाॅवित्झरची तैनाती लडाखजवळच्या सीमेवर केली आहे.भारताची यंत्रणाही झाली आहे सज्ज भारताने चीनला उत्तर देण्यासाठी हेराॅन १ आणि एएलएच ध्रुव हेलिकाॅप्टरचा समावेश एव्हीएशन ब्रिगेडमध्ये केला आहे. तसेच एल ७० विमानभेदी ताेफादेखील उंच पर्वतरांगांवर सज्ज केल्या आहेत. चीन ताेफांचा सामना करण्यासाठी रणगाडाभेदी क्षेपणास्त्राचीही तैनाती भारताने केली आहे. दाट धुक्यांमध्येही शत्रूच्या रणगाड्यांचा वेध घेण्यास क्षेपणास्त्र सज्ज आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव