लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 08:46 AM2020-05-24T08:46:34+5:302020-05-24T10:52:06+5:30

भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

tension mounts in ladakh as china brings in more troops india maintains aggressive vrd | लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

Next
ठळक मुद्देचीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

नवी दिल्ली- चीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. त्यामुळे भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संघर्षादरम्यान चीननं भारताच्या जवानांना ताब्यात घेतल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु भारतीय लष्करानं या वृत्ताचं खंडन केलं आहे. 

दरम्यान, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेह येथील 14 वाहिनीच्या मुख्यालयाला भेट दिली आणि एलएसीवरील वादग्रस्त जागेसह संपूर्ण परिसराच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. सैन्य सूत्रांनी सांगितले की, भारतीय सैन्य त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या दोन्ही ठिकाणी चिनी सैन्याशी सामना करण्यासाठी सैन्य पाठवत आहे. इतर अनेक संवेदनशील भागात भारत चीनपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहे. 5 मे रोजी पूर्वेकडील लडाखमधील परिस्थिती आणखी चिघळली होती, जेव्हा सुमारे 250 चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात हिंसक चकमक झाली होती.

दुसर्‍या दिवसापर्यंत तो संघर्ष सुरूच होता. नंतर दोन्ही बाजूच्या लोकल कमांडरची बैठक झाली आणि दोन्ही बाजूचे सैनिक माघारी फिरले. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी लाठीकाठीने एकमेकांवर हल्ला केला आणि दगडफेकही केली होती. या हिंसक चकमकीत दोन्ही बाजूचे सुमारे 100 सैनिक जखमी झाले. 9 मे रोजी सिक्कीममध्ये पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. नाकू ला पास येथे जवळपास 150 भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे किमान दहा सैनिक जखमी झाले.

गेल्या आठवड्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेचे अनेक वेळा उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही किंवा याची पुष्टीही झालेली नाही. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या स्थानिक कमांडरमध्ये किमान पाच बैठका झाल्या. या बैठकीत भारतीय कमांडरने गॅल्व्हान व्हॅलीमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)ने मोठ्या प्रमाणात तंबू उभारल्याबद्दल आक्षेप घेतला. पीएलए ज्या भागात तंबू उभारत आहे, तो भाग भारताच्या हद्दीतील आहे. 

Web Title: tension mounts in ladakh as china brings in more troops india maintains aggressive vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.