शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: चाचणीस नकार; हात धुण्याचा सल्ला; रुग्णालयांचा हलगर्जीपणा मुलाच्या जीवावर बेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:04 IST

Coronavirus चार रुग्णालयांचा दाखल करुन घेण्यास नकार; हलगर्जीपणा जीवावर बेतला

श्रीनगर: कोरोनामुळे एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये घडली. कोरोनाबाधित धर्मगुरुच्या संपर्कात आल्यानं इदगाहमध्ये राहणाऱ्या मुलामध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यामुळे त्यानं तातडीनं रुग्णालय गाठलं. एकाच दिवशी तो चार रुग्णालयांमध्ये गेला. मात्र जागा नसल्याचं कारण देत रुग्णालयांनी चाचणी करण्यास नकार दिला. घरीच राहण्याचा आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला मुलाला रुग्णालयांकडून देण्यात आला. योग्य वेळी उपचार न मिळाल्यानं या मुलाचा मृत्यू झाला.मंगळवारी जमालची (नाव बदलण्यात आलंय) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याला शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात (एसकेआयएमएस) दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधी जवळपास दोन दिवस तो वडिलांसह काही रुग्णालयांमध्ये जात होता. मात्र त्याला दाखल करून घेण्यात आलं नाही. 'मी हात जोडून रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली होती. मात्र कोणीही माझं ऐकलं नाही,' अशा शब्दांत मृत मुलाच्या वडिलांनी साश्रू नयनांनी त्यांच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. सध्या ते आणि त्यांचं कुटुंब एसकेआयएमएस रुग्णालयात क्वॉरेंटाईनमध्ये आहे. गेल्या महिन्यात १८ ते २२ दरम्यान एका धार्मिक कार्यक्रमात १० जमालनं धर्मगुरुसोबत हस्तांदोलन केलं होतं. काही दिवसांनी त्या धर्मगुरुंना कोरोना झाल्याचं निदान झालं. जमालमध्येही कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्याला ताप आला. २८ मार्चला त्याला एसएमएचएस रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयानं त्याला दाखल करुन घेण्यास नकार दिला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला सीडी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी त्याला तातडीनं रुग्णवाहिकेतून सीडी रुग्णालयात नेलं. सीडी रुग्णालयानं त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. जवाहरलाल नेहरु मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला. रुग्णालयात पुरेशा खाटा नसल्याचं कारण त्यांनी सांगितलं. रुग्णालयांच्या या फेऱ्यांमध्ये जमील आणि त्याच्या कुटुंबाचा फार वेळ गेला. अखेर काल जमीलचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानं जमीलच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या