शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"तेली का बेटा..."! PM मोदींवरील 'ते' वक्तव्य ममतांना महागात  पडणार, सुवेंदू अधिकारी यांनी OBC मुद्दा तापवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:11 IST

"राज्यातील ओबीसी लिस्टमध्ये असलेल्या एकूण 179 जातींपैकी 118 जाती या मुस्लीम समाजाशी संबंधित..."

लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर, राजकीय पक्षांकडून आपापल्या पक्षांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. जस-जशा मतदानाच्या तारखा जवळ येत आहेत, तस तसा नेत्यांच्या भाषेचा दर्जाही खालावताना दिसत आहे. नुकतेच टीएमसी नेते पियुष पांडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीचा उल्लेख करत भाष्य केले होते. पंतप्रधानांच्या जातीचा उल्लेख करत पांडा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी हा ओबीसी समाजाचा अपमान असल्याचे म्हणत मुद्दा तापवायला सुरुवात केली आहे. ऐन निवडणूक काळात सुरू झालेला हा वाद ममता बॅनर्जींना महागात पडू शकतो. कारण पश्चिम बंगालमध्ये ओबीसी समाजाचा वाटा जवळपास 16 टक्के एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, सुवेंदू यांनी तुष्टीकरणाचा आरोप करत ओबीसी यादीची चर्चाही सुरू केली आहे.

तेली अन् बूट पॉलिश -यासंदर्भात सुवेंदू अधिकारी यांनी एक्सवर मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, टीएमसी प्रादेशिक युनिटचे अध्यक्ष पीयूष पांडा जर काही बोलले असतील तर, ती त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका मानली जायला हवी. 'पांडा यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'तेल्याचा मुलगा' संबोधून अपमान करण्याचा प्रयत्न केला नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्हे, संपूर्ण ओबीसी समाजाचाच अपमान केला आहे. तसेच, बूट पॉलिश करने हे ओबीसी समाजातील लोकांसाठी चांगले काम आहे,' असेही त्यांनी इशारा करत म्हटले आहे."

सुवेंदूंची ओबीसी मुद्दा तापवायला सुरुवात -सुवेंदू एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पांडा यांच्या नेत्याने (ममता बॅनर्जी) आधीच मागास प्रर्गासंदर्भातीत मंडल आयोगचे निकष कमकुवत  केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये खऱ्या ओबीसी समाजाला वंचित करत, त्यांनी आपल्या पसंतीच्या व्होट बँकेला चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ दिला आहे. खरे तर, राज्यातील ओबीसी लिस्टमध्ये असलेल्या एकूण 179 जातींपैकी 118 जाती या मुस्लीम समाजाशी संबंधित आहेत. गेल्या वर्षातील एका अहवालानुसार, 2011 नंतर राज्यातील ममता सरकारने 65 मुस्लीम आणि 6 हिंदू जातींचा यात समावेश केला आहे.

सुवेंदू पुढे म्हणाले, ममता बॅनर्जींनी ओबीसी समाजाला शिव्या देण्याचा अधिकार आपल्या ज्युनिअर नेत्यांना दिला आहे, असे वाटते. कारण असे नसते, तर अशा खालच्या स्थरावरील नेत्याची पंतप्रधानांसंदर्भात, असे बोलण्याची हिंमत झाली नसती. याशिवाय, सुवेंदू यांनी राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना यासंदर्भात दखल घेण्याची विनंती केली आहे. तसेच, संबंधित नेत्याला निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

काय म्हणाले होते पांडा? -सुवेंदू यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलेल्या त्याच्या अनुवादानुसार, पांडा म्हणाले, त्यांनी (पीएम मोदी) एका अर्धवट राममंदिराचे उद्घाटन केले.  4 शंकराचार्यांनी  म्हटले आहे की, हिंदू धर्मात असे होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी अभिमानी आहेत. ते एका त्याचे पुत्र आहेत. ते राम मंदिराचे उद्घाटन आणि पूजा कशी करू शकतात.' 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिरBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस