वडिलांसमोर लेकीला किडनॅप केलं, 24 तासांत चक्र फिरलं; मुलीच्या Video ने नवा ट्विस्ट, म्हणते....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:57 IST2022-12-21T16:46:26+5:302022-12-21T16:57:30+5:30

अपहरणाच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं आहे. नवा ट्विस्ट आला आहे. तरुणीचा एक व्हिडिओ आता तुफान व्हायरल झाला आहे

telangana student kidnapping case dramatic twist video viral | वडिलांसमोर लेकीला किडनॅप केलं, 24 तासांत चक्र फिरलं; मुलीच्या Video ने नवा ट्विस्ट, म्हणते....

वडिलांसमोर लेकीला किडनॅप केलं, 24 तासांत चक्र फिरलं; मुलीच्या Video ने नवा ट्विस्ट, म्हणते....

तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात एका १८ वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने खळबळ उडाली होती. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. पण आता अपहरणाच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं आहे. नवा ट्विस्ट आला आहे. तरुणीचा एक व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती म्हणत आहे की तिचे अपहरण झालेलं नाही आणि ती स्वतः तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी गेली आहे. 

मुलीच्या अपहरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तेलंगणा पोलिसांवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता हा विचित्र प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चंदुर्थी मंडळातील मुदेपल्ले गावात पहाटे 5.30 च्या सुमारास मुलगी आणि तिचे वडील मंदिरात जात असताना अपहरण झाले. 

मुलीच्या अपहरणाची ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपहरणकर्त्यांनी विद्यार्थिनीला जबरदस्तीने गाडीत ओढले आणि तेथून पळ काढला. स्थानिक टीव्ही चॅनेलद्वारे प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये मुलीचे वडील तिला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसत आहेत. नंतर, पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि आरोप केला की टोळीच्या सदस्यांनी आपल्या मुलीचे अपहरण करण्यापूर्वी त्यांना मारहाण केली. 

एक आरोपी आपल्याच गावातील असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तपासा दरम्यान दोघांना पकडण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. पण दुपारपर्यंत, मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तिने सांगितले की तिचे अपहरण झालेले नाही आणि तिने स्वतःच तिच्या 24 वर्षीय प्रियकराला फोन केला आणि तिला घेऊन जाण्यास सांगितले. या घटनेने सर्वच जण हैराण झाले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: telangana student kidnapping case dramatic twist video viral