Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:39 IST2025-11-02T14:38:22+5:302025-11-02T14:39:03+5:30
Telangana Man Kills Family: तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली.

Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. कुलकाचेरला मंडल येथे शनिवारी रात्री एका ४० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबावर हिंसक हल्ला केला, ज्यात त्याची पत्नी, धाकटी मुलगी आणि एका नातेवाईकाचा मृत्यू झाला. यानंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. एकाच घरातून चार मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली
ही भयानक घटना कुलकाचेरला मंडल परिसरात पहाटे २:३० ते ३:०० च्या दरम्यान घडली. आरोपीने त्याच्या मोठ्या मुलीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती पळून जाण्यास यशस्वी ठरली. तिला गंभीर अवस्थेत उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून त्या पुरुषाने हे अत्यंत हिंसक पाऊल उचलले असावे, असा पोलिसांना संशय आहे. त्याने संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्यानंतर घरात गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच परिसरात घबराट पसरली. इतके हिंसक पाऊल का उचलले, त्याने आपल्या १० वर्षांच्या निष्पाप मुलीबद्दलही विचार का केला नाही? आणि नातेवाईक महिलेची हत्या का केली, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली असून, घटनेचा प्रत्येक कोनातून तपास सुरू केला आहे. या सामूहिक हत्याकांड आणि आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.