तेलंगणातील कामारेड्डी येथे शनिवारी काँग्रेस आणि भाजपाकार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. राज्य सरकारचे सल्लागार मोहम्मद अली शब्बीर आणि भाजपा आमदार के. व्यंकट रमणा रेड्डी यांच्यात एका जमिनीच्या प्रकरणावरून झालेल्या शाब्दिक युद्धातून या वादाला सुरुवात झाली.
भाजपा आमदाराच्या कॅम्प ऑफिसजवळ ही घटना घडली. माजी सरपंच आणि काँग्रेस नेते गिरी रेड्डी महेंद्र रेड्डी आपल्या समर्थकांसह आमदार कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आमदाराच्या विरोधात घोषणा दिल्या. यामुळे राजकारण तापलं.
भाजपा आमदाराने संबंधित जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप मोहम्मद अली शब्बीर यांनी केला होता. यावर आमदार रमणा रेड्डी यांनी जाहीर चर्चेचं आव्हान दिलं होतं. दोन्ही बाजूंचे समर्थक समोरासमोर आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
या गोंधळादरम्यान काँग्रेस नेते महेंद्र रेड्डी यांच्या कारची तोडफोड करण्यात आली आणि ती उलटवण्यात आली. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये पोलीस कर्मचारी गर्दीला पांगवताना आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
एन. रामचंद्र राव यांनी सोशल मीडियावर या घटनेचा निषेध करत याला "लोकशाहीत अस्वीकार्य राजकीय हिंसाचार" म्हटले आहे. त्यांनी स्वतः कामारेड्डीचा दौरा करणार असल्याचं जाहीर केले होतं. मात्र रविवारी नियोजित दौऱ्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून नजरकैदेत ठेवल्याचं त्यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला सांगितलं.
कामारेड्डीचे पोलीस अधीक्षक राजेश चंद्र यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे, परंतु परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Web Summary : Congress and BJP workers clashed in Kamareddy, Telangana, over land dispute allegations. The incident escalated, leading to vandalism and police intervention. Several individuals were detained, and extra security was deployed to control the situation.
Web Summary : तेलंगाना के कामारेड्डी में भूमि विवाद के आरोपों को लेकर कांग्रेस और भाजपा कार्यकर्ता आपस में भिड़ गए। घटना बढ़ने पर तोड़फोड़ हुई और पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा। कई लोगों को हिरासत में लिया गया और स्थिति को नियंत्रित करने के लिए अतिरिक्त सुरक्षा तैनात की गई।