शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 9:36 AM

सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे यावेळी रुग्णालयाचे त्या मृतदेहाचं शवविच्छेदन किंवा तपासणी वगैरे काहीही केलेलं नाही. 

हैदराबादः कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रासह अनेक राज्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यश येतानाही दिसते आहे. पण गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीत कोरोना व्यक्तींच्या येत असलेल्या मृतदेहांनी सरकारची झोप उडवलेली होती. आता तेलंगणाच्या निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला अन् त्या रुग्णाचा मृतदेह अँब्युलन्सनं नव्हे, तर ऑटो रिक्षाच्या मदतीने अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे रुग्णालयानं त्या मृतदेहाचं शवविच्छेदन किंवा तपासणी वगैरे काहीही केलेलं नाही. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय व्यवस्थापनाने 50 वर्षांच्या कोरोना रुग्णाचा मृतदेह कोणत्याही रुग्णवाहिकेविना अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांकडे सोपविला. निजामाबाद सरकारी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागेश्वर राव यांनी सांगितले की, मृतांचा नातेवाईक रुग्णालयात काम करतो. त्याच्या विनंतीवरून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या शवागारात काम करणा-या व्यक्तीच्या मदतीने मृतदेह ऑटोरिक्षात ठेवला. त्या ऑटोरिक्षातूनच तो मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आला. या घटनेनं तेलंगणात एकच खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही हा प्रकार वाऱ्यासारखा पसरला आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना डॉ. राव म्हणाले, '50 वर्षीय रुग्णाला 27 जून रोजी निजामाबाद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला कोरोना संसर्ग झाल्याची खात्री पटली होती. काल त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आमच्या रुग्णालयात काम करणा-या त्याच्या नातेवाईकांनी आम्हाला मृतदेह देण्यास सांगितले. त्यांच्या विनंतीनंतर आम्ही मृतदेह ताब्यात दिला. त्यांनी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा केली नाही आणि ऑटोच्या मदतीने मृतदेह घेऊन गेले, असंही डॉ. राव यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या