tejashwi yadav tejpratap yadav eat dosa together at bihar vidhan sabha | बंधूप्रेम : तेजस्वी यादवांना मोठा भाऊ तेजप्रताप यांनी भरवला डोसा

बंधूप्रेम : तेजस्वी यादवांना मोठा भाऊ तेजप्रताप यांनी भरवला डोसा

नवी दिल्ली -  राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यातील बंधूप्रेम विधानसभेच्या कॅन्टीमध्ये पाहायला मिळाले. तेजप्रताप आणि तेजस्वी यांनी एकमेकांना डोसा भरवून भावाभावात किती सौख्य आहे हे दाखवून दिले.

बिहारच्या राजकारणात सतत चर्चेत असलेले माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह राजदचे नेते शुक्रवारी विधानसभेच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले होते. यावेळी एकाच टेबलवर बसलेल्या तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांनी डोसा खाण्याचा आनंद घेतला. यावेळी दोघा भावांनी एकमेकांना डोसा भरवला.

राजदच्या इतर नेत्यांनी देखील यावेळी डोसा खाण्याचा आनंद घेतला. दोघा भावाचे प्रेम पाहून राजद नेते आश्चर्यचकित झाले. तेजप्रताप यादव ज्यावेळी आरोग्यमंत्री होते तेव्हा देखील ते कॅन्टीनच्या जेवनावर लक्ष ठेवून होते. आता तर त्यांनी भावाला डोसा खाऊ घालण्यासाठी कॅन्टीनमध्येच नेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दोघांना जुन्या दिवसांची आठवण झाली. तेजप्रताप म्हणाले की, मी मंत्री असताना येथे नेहमीच यायचो. मात्र आता बऱ्याच दिवसांनी कॅन्टीनमध्ये आलो आहे. येथील डोसा छान मिळतो, असंही ते म्हणाले.

Web Title: tejashwi yadav tejpratap yadav eat dosa together at bihar vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.