शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

'माझ्या हत्येचा कट रचला जातोय', तेजस्वी यादव यांचा नितीश कुमार सरकारवर गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 12:24 IST

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी (22 फेब्रुवारी) बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

पाटणा - बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी (22 फेब्रुवारी) बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ''संविधान बचाओ न्याय यात्रे''मुळे घाबरल्यानं आता सरकार माझ्या हत्येचा कट रचत आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.  तेजस्वी यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. त्यांच्या फोन टॅपिंगनंतर आता सर्किट हाऊस जेथे ते रात्रीच्या वास्तव्यास आहेत तसंच सभास्थळांच्या ठिकाणी त्यांची हेरगिरी केली जात असल्याचाही आरोप तेजस्वी यांनी केला आहे. दरम्यान, संविधान बचाओ न्याय यात्रेदरम्यान खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये विषारी पदार्थ मिसळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप तेजस्वी यांनी बिहार सरकारवर केला आहे.

आपल्याविरोधात रचण्यात येत असलेल्या कटाविरोधातील माहिती विश्वस्त सूत्रांकडून मिळाल्याचं त्यांनी सांगितले. संविधान बचाओ न्याय यात्रेला जनतेचा प्रचंड प्रमाणात समर्थन मिळत आहे, यामुळे बिहार सरकार त्यांच्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. या यात्रेदरम्यान होणा-या सभांमुळे बिहार सरकार बिथरलं आहे,घाबरलं आहे, असेदेखील तेजस्वी म्हणालेत. मी नितीश कुमार यांचे काय वाकडे केले आहे?, ते माझ्यामागे का लागले आहेत?, हेच समजत नाही, असेही तेजस्वी म्हणालेत. 

 

लालूंच्या मुलाने भूताला घाबरुन सोडला बंगला

दरम्यान, तेज प्रताप यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर आरोप केले होते. ''मला घराबाहेर काढण्यासाठी नितीश कुमारांनी माझ्या बंगल्यात भूतं पाठवली होती, असा खळबळजनक आरोप तेज प्रताप यादव यांनी केला. तेज प्रताप यादव राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आहे. सत्ता गेल्यानंतर सहा महिन्यांनी तेज प्रताप यादव यांनी त्यांचे अधिकृत सरकारी निवासस्थान सोडले आहे. मला त्रास देण्यासाठी नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी माझ्या बंगल्यात भूतं सोडली होती, असे तेज प्रतापने रविवारी (18 फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तेज प्रताप आरोग्य मंत्री होते. त्यावेळीत्यांना देशरत्न मार्गावरील 3 नंबर बंगला देण्यात आला होता. 2015 सालची बिहारची विधानसभा निवडणूक जदयू, राजद आणि काँग्रेस यांनी महाआघाडी करुन लढवली होती. त्यावेळी 243 सदस्यांच्या विधानसभेत या महाआघाडीला 178 जागा मिळाल्या होत्या. पण 20 महिन्यातच या महाआघाडीत फूट पडली आणि सरकार कोसळले. त्यानंतर नितीश यांनी जुलै महिन्यात भाजपाबरोबर आघाडी करुन सरकार स्थापन केले.                                  

ऑगस्ट महिन्यात बिहार सरकारने राजद आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना बंगले रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तेज प्रताप यादव अति धार्मिक, दैववादी आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात यादव कुटुंबाविरोधात केंद्रीय पथकाकडून चौकशी सुरु असताना तेज प्रताप यांनी बंगल्यामध्ये दुश्मन मारन जपही केला होता असे सूत्रांनी सांगितले. दुसरी नोटीस मिळाल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी बंगला रिकामी करण्याचा निर्णय घेतला असे आरजेडीचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी सांगितले. ऑक्टोंबर महिन्यात तेज प्रताप यादव यांना दुसरी नोटीस मिळाली. त्यामध्ये बंगल्याच्या मूळ भाड्याच्या 15 पट जास्त दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला होता, अशी माहिती आरजेडीमधील सूत्रांनी दिली.         

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव