आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:48 IST2025-11-18T13:46:49+5:302025-11-18T13:48:22+5:30
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यादव आज आमदारांच्या बैठकीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कुटुंबातील वादामुळे ते तणावात असल्याचे दिसून आले.

आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
बिहार विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाचा मोठा पराभव झाला.पक्षाला झालेला पराभव पचवणे कठीण जात आहे. दरम्यान, काल पक्षाची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांची राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पुन्हा निवड झाली. या बैठकीत नाराजीचा सूर पाहायला मिळाला. सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तेजस्वी यादव भावनिकही झाले. 'जर आमदारांची इच्छा असेल तर मी नेतृत्व सोडण्यास तयार आहेत. जर आमदारांचे मत असेल तर ते दुसऱ्या कोणाला तरी नेता म्हणून निवडू शकतात',असंही तेजस्वी यादव म्हणाले.
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
एका आमदाराने सांगितले की, तिकीट वाटप आणि पराभवाबाबतच्या आरोपांमुळे तेजस्वी यादव दुखावले आहेत. बैठकीदरम्यान त्यांनी असेही म्हटले की, "मी काय करावे? मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी की पक्षाची?" तेजस्वी यादव त्यांच्या बहिणी रोहिणी आचार्य यांनी केलेल्या आरोपांमुळे दबावाखाली असल्याचे दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी अजूनही उघड उघड काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांचे सल्लागार आणि जवळचे सहकारी, संजय यादव आणि रमीज नेमत खान यांच्यावरही आरोप आहेत. तेजस्वी यादव फक्त त्यांचेच ऐकतात, असा आरोपही त्यांच्यावर होत आहे.
बैठकीत भावूक वातावरण
तेजस्वी यादव यांच्या अचानक प्रस्तावामुळे भावनिक गोंधळ निर्माण झाला. उपस्थित सर्व आमदारांनी त्यांना त्यांचे नेते राहावे असा आग्रह धरला. लालू यादव यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि आमदारांना त्यांचे मन वळवण्यास सांगितले. त्यानंतर आमदारांनी एकमताने तेजस्वी यादव यांना त्यांचे नेते म्हणून निवडले. राबडी देवी, मीसा भारती आणि तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी संजय यादव हे देखील यावेळी उपस्थित होते.
या निवडणुकीत पक्षाने १४३ जागा लढवल्या पण यामधील २५ जागांवर विजय मिळवला. आरजेडी तिसरा पक्ष ठरला आहे. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बैठकीत EVM वर प्रश्न
याआधीही बिहारमध्ये असा निकाल आला होता. २०१० मध्ये आरजेडीला फक्त २२ जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी त्यावेळी त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळवता आले नाही. या बैठकीत जगदानंद सिंह म्हणाले की, ईव्हीएम त्यांच्या पराभवाचे कारण आहे. या मशीनचा गैरवापर झाला. आमदार भाई वीरेंद्र यांनीही या दाव्याचे समर्थन केले.आपण ईव्हीएमविरुद्ध लढले पाहिजे. आपण फक्त मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली पाहिजे, असंही सिंह या बैठकीत म्हणाले.